आत्महत्येसाठी 'ती' तलावात उडी मारणार, इतक्‍यात... | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्महत्येसाठी 'ती' तलावात उडी मारणार, इतक्‍यात...
आत्महत्येसाठी 'ती' तलावात उडी मारणार, इतक्‍यात...

आत्महत्येसाठी 'ती' तलावात उडी मारणार, इतक्‍यात...

सोलापूर : मंगळवारची सायंकाळी पाच वाजताची वेळ....एक महिला छत्रपती संभाजी तलावाजवळील (Chhatrapati Sambhaji Lake) पुलाच्या लोखंडी पाईपवर चढत असताना दिसली... अगदी काहीवेळातच मृत्यूला जवळ करण्यास तयार असलेल्या त्या महिलेस रेल्वे पोलिस (Railway Police) शिपाई मिथून राठोड (Mithun Rathod) यांनी पाहिले... दुचाकीवरून चाललेल्या राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या मनीषा नलावडे (Manisha Nalawade) याही धावत आल्या व त्या दोघांनी त्या महिलेचे प्राण वाचवले.

हेही वाचा: दही खरेदीसाठी चक्क ड्रायव्हरने थांबवली ट्रेन! पाकिस्तानातील घटना

छत्रपती संभाजी तलावाच्या जवळ झालेल्या या घटनेत रेल्वेचे पोलिस शिपाई मिथून राठोड यांनीही समयसूचकता दाखवली. त्यांच्यासमवेत कॉंग्रेस नेते डॉ. बसवराज बगले हे महिलेला पुलावरून बाजूला घेण्यात यशस्वी झाले. या महिलेला बाजूला घेतल्यानंतर ती ओक्‍साबोक्‍सी रडू लागली. डॉ. बसवराज बगले आणि मनिषा सुखदेव नलावडे यांनी तिची विचारपूस केली असता ती प्रचंड तणावात होती. तिला बोलताही येत नव्हते.

दरम्यान, त्याच रस्त्याने निघालेले साखर पेठ पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक नरसप्पा राठोड यांनी तत्काळ थांबून त्यांनीही चौकशी केली. त्या महिलेला धीर दिला. कर्तव्यदक्षतेने जवळच्या वॉकीटॉकीवरून वायरलेस संदेश दिला. अगदी पाच मिनिटांत सदर बझार पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस मनीषा गायकवाड व सौ. तांबोळी या तेथे दाखल झाल्या. पोलिस उपनिरीक्षक नरसप्पा राठोड यांनी त्या महिलेला पोलिस ठाण्यात नेऊन तिला मदत करण्याची भूमिका बजावली.

हेही वाचा: डिजिटलवाढीसाठी गरिबांना मोबाईल सबसिडी द्या - मुकेश अंबानी

आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते राजू तुरबे, रसीद शेख आदींनी या कामी मदत केली. रात्री सातपर्यंत त्या महिलेची सदर बझार पोलिस ठाण्यात चौकशी झाल्यानंतर पोलिस कर्मचारी तमीम हिरापुरे आणि श्री. कदम यांनी तिच्या नातेवाइकांचा शोध घेतला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर पाटील यांच्या सूचनेनुसार महिला पोलिस राजश्री माळी यांच्या मदतीने त्या महिलेला तिच्या बहिणीकडे बुधवार पेठेतील मच्छी मार्केटमध्ये पोलिस वाहनातून सोडले. त्यानंतरच डॉ. बसवराज बगले आणि मनीषा नलावडे यांनी पोलिस ठाणे सोडले.

Web Title: Womans Life Saved Due To Police Alert At Sambhaji Lake

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :maharashtraviralupdate
go to top