सलगर खुर्द ग्रामपंचायत कारभारणींच्या ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women win all seven seats of Salgar Khurd Gram Panchayat

सलगर खुर्द ग्रामपंचायत कारभारणींच्या ताब्यात

सलगर बुद्रुक (जि. सोलापूर) - सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या सलगर खुर्द ग्राम पंचायतीवर संपूर्ण महिला निवडून गेल्या आहेत.त्यामुळे गावचा गाडा हाकण्याचे काम कारभारनिंणकडे गेले आहे.गावच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामपंचायतीवर महिला राज आल्याने गावातील सर्व महिला खुश आहेत.

या ग्रामपंचायती मध्ये सात सदस्य आहेत.विद्यमान सरपंच देखील महिलाच आहेत. त्यांचा कारभार आणखी डिसेंबर पर्यंत चालणार आहे.दरम्यान नव्याने निवडून आलेल्या महिला सदस्या ह्या अंजली बिभीषन पाटील, साळूबाई ज्ञानोबा मासाळ, चिमाबाई महादेव बेलदार, आरती अजय कांबळे, मनीषा रमेश ओलेकर, संध्यारणी विलास काटकर, द्रोपदा अरविंद पाटील या आहेत. यापैकी द्रोपदा अरविंद पाटील व आरती अजय कांबळे या दोन सदस्या विरोधातील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज काढून घेतल्याने त्या बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे सात पैकी पाच जागांवरच ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

दरम्यान सदर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला असे पडल्याने सर्व जागेवर महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडनिकीत ग्रामपंचायतीवर महिला राज आले आहे. परंतु जरी या ग्रामपंचायतीवर महिला राज आले असले तरी ग्रामपंचायतीचा प्रत्यक्ष कारभार, कारभारी कारभारनिंणा चालवू देतील की स्वताच चालवतील असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

Web Title: Women Win All Seven Seats Of Salgar Khurd Gram Panchayat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..