राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन अजिंक्यराणा दिसले थेट शेतात ट्रॅक्टर चालवताना

Work in agriculture while Ajinkyaran Patil of Mohol taluka
Work in agriculture while Ajinkyaran Patil of Mohol taluka

सोलापूर : गेल्या आठवड्यात मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ‘पुढील काळात नव्या व्यक्तीला संधी देण्यात यावी, म्हणून आपण राजीनामा दिला’ असल्याचे ते म्हणत आहेत. त्यांच्या या राजीनाम्यावरुन मात्र त्यांच्याकडे कोणती नवीन जबाबदारी मिळणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे. राजीनामा दिल्यानंतर ते थेट शेतात कामगारांना मदत करताना दिसले आहेत. त्याचे फोटो त्यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर टाकले आहेत. 
अजिंक्यराणा यांनी फेसबुक वॉलवर द्राक्ष बागेत ट्रॅक्टर चालव असल्याचे फोटो टाकले आहेत. याबरोबर ते बागेत पाहणी करत आहेत. याबाबत पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, ‘राजकीय कामातून वेळ मिळाल्यानंतर मी आवर्जून शेतात काही वेळ घालवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातून एक प्रसन्नता मिळते. मन प्रफुल्लित होण्यास मदत मिळते. सध्या शेतात द्राक्ष काढणी सुरु आहे. त्यामुळे रिकाम्या वेळात कामगारांना छोटीशी मदत करत त्यांच्या कामाबद्दल जाणून घेण्याचा लहानसा प्रयत्न केला.’ अजिंक्यराणा पाटील हे मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणूकीदरम्यान सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील नेत्यांचे मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरु होते. अशा पडत्या काळातही माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ सोडली नाही. लोकसभा निवडणूकीत त्यांनी सुशिलकुमार शिंदे यांना चांगले मताधिक्य मिळवून दिले. विधानसभा निवडणूकीतही आमदार यशवंत माने यांना विजयी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. जिल्ह्यात ते राष्ट्रवादीचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. अशा स्थितीत त्यांचे चिरंजिव अजिंक्यराणा यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा दिला आहे. ‘पुढील काळात पक्ष देईल, ती जबाबदारी स्वीकारत राष्ट्रवादीचा प्रमाणिक कार्यकर्ता म्हणून काम करत राहील’, असं त्यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर म्हटलं आहे. 
त्यांनी केलेल्या पोस्टवर त्यांच्या समर्थकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. त्यात सुरज इजागर यांनी म्हटले की, ‘येणाऱ्या काळात तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्त्व करणार हे नक्की...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com