जग परत दिसू लागलं... लै आनंद झालाय...!

 The world is back again ... glad ...!
The world is back again ... glad ...!

सोलापूर - "देवाची आन घिऊन सांगतो, काय बी दिसत नव्हतं मला. म्हणून कुटं जाता - येता बी येत नव्हतं. घराजवळच वडाच्या झाडाला सोताला बांधून घिऊन गिरट्या घालायचो तितं. पण आज मला सोलापुरात विठोबाच भेटला. डाक्‍टरनं लै झकास काम केलंय, आता मला जग परत दिसू लागलंय... शप्पथ लै लै आनंद झालाय...! 

ही वाक्‍यं आहेत बीड येथील 82 वयाच्या सुखदेव यादवराव शिंदे यांची. 12-15 वर्षांपासून अजिबातच दिसत नसलेल्या श्री. शिंदे यांच्यावर डॉ. नववीन तोष्णिवाल यांच्या दवाखान्यात एक डोळा रोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. 

डॉ. तोष्णिवाल म्हणाले, दोन महिन्यांपासून श्री. शिंदे यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना मोतीबिंदू होता शिवाय बुबळही पांढरे झाले होते. योग्य उपचारानंतर मोतिबिंदू काढला. त्यानंतर एक अडचण समोर आली, ती म्हणजे शिंदे यांच्या डोळ्याला इन्फेक्‍शन झाले. पण परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी हार मानायची नाही हे माझे बाबा डॉ. श्‍याम सरांचे वाक्‍य मला आठवले. त्यानंतर न खचता उपचार सुरू केले. यादरम्यान सोलापुरात सुस्थितीतील डोळे उपलब्ध झाले. योग्य वेळी डोळे उपलब्ध झाल्याने मी श्री. शिंदे यांच्या डोळ्यावर रोपण करू शकलो. यात भूलतज्ज्ञ डॉ. सुशील मर्दा यांची चांगली मदत झाली. कारण, 82 वयाच्या वृद्धाला योग्य मात्रेची भूल देणं तसं अवघड काम असतं. चॅलेंजिंग काम होतं, पूर्ण डोळा बसवणं, टाके घालणं वगैरे वगैरे... पण हे आज सोलापुरात पार पडलं याचा मला फार आनंद आहे. दरम्यान, श्री. शिंदे यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी सौ. वैजयंता सोलापुरात त्यांची सुश्रुशा करण्यासाठी आल्या आहेत. 

डाॅक्टर झाल्याचे समाधान मिळते
रुग्ण शिंदे यांना एकच डोळा आहे. अशा पद्धतीची ही माझ्या कार्यकाळातील दुसरी - तिसरी शस्त्रक्रिया असावी. अशी अवघड शस्त्रक्रिया सोलापुरातही पार पडू शकते, यशस्वी होऊ शकते याचा मला आनंद वाटला. कार्यकाळातील अशी अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या हातावेगळी केल्यानंतर डॉक्‍टर असल्याचे मानसिक समाधान मिळतं. 
- डॉ. नवनीत तोष्णिवाल 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com