Sikandar Shaikh : पैलवान सिकंदर शेख ‘भीमा केसरी’चा दुसऱ्यांदा मानकरी

टाकळी सिकंदरमध्ये कारखाना स्थळावर मल्लांची दंगल; १५ हजारजणांच्या उपस्थितीत थरार
wrestler sikandar shaikh second time bhima kesari sport mohol
wrestler sikandar shaikh second time bhima kesari sport moholSakal
Updated on

Mohol News : पंधरा हजारांपेक्षा जास्त कुस्ती शौकिनांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत झालेल्या लढतीत या वर्षीचा ‘भीमा केसरी’ होण्याचा मान पैलवान सिकंदर शेख याने पटकावला.पंजाब केसरी प्रदीपसिंग जिरगपूरला चितपट करत सिकंदर शेखने डबल भीमा केसरी किताब घेण्याची किमया केली आहे.

राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा देत सिकंदर शेख याचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, कुस्ती क्षेत्रासाठीच योगदान विचारात घेऊन खासदार महाडिक यांचा सन्मान करत सिकंदरने श्री महाडिक यांना खांद्यावर घेत मैदानाची फेरी मारली.

या स्पर्धेचे आयोजन भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी कारखाना कार्यस्थळावर केले होते. भीमा केसरीच्या किताबासाठी झालेल्या लढतीत दोन्ही ही पैलवान हे तुल्यबळ होते.

पंजाब केसरी विजेता प्रदीपसिंग जिरगपूर विरुद्ध महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अशी कडवी झुंज झाली. १५ व्या मिनिटाला वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदर पुढे प्रदीपसिंगचा निभाव लागला नाही.

प्रदीपसिंगला चितपट करून सलग दुसऱ्यांदा भीमा केसरी होण्याचा बहुमान सिकंदर शेख ने पटकाविला. यावेळी मनोहर डोंगरे, धैर्यशील मोहिते-पाटील, शिवाजीराव काळुंगे, उमेश पाटील, सुजित कदम, समाधान काळे,

wrestler sikandar shaikh second time bhima kesari sport mohol
Solapur Crime : वधू-वरांचे दागिने मुहूर्ताच्या अगोदरच लंपास; सदाशिवनगरच्या मंगल कार्यालयातून साडेपाच लाखांची चोरी

बी.पी.रोंगे, मानाजी माने, श्रीकांत देशमुख, विराज अवताडे, चरणराज चवरे, पृथ्वीराज माने, दीपक माळी, शिवाजी पवार, सतीश जगताप, तानाजी गुंड, शिवाजी गुंड सुशील क्षीरसागर, काकासाहेब पवार, अस्लम काझी यांच्यासह भीमा कारखाना आजी-माजी संचालक,भीमा परिवारातील कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने कुस्ती शौकीन उपस्थित होते.

लाल आखड्यात मल्ल रणरागिनींचीही झुंज

दरम्यान भीमा केसरीच्या आखाड्यात प्रथमच महिला पैलवानांच्या कुस्त्यांची घोषणा करण्यात आली.पूर्ण कुस्ती सूट घालून महिला पैलवान मुली लाल मैदानाच्या आखाड्यात उतरल्या. खा धनंजय महाडिक यांच्या मातोश्री मंगलताई महाडिक व स्नूषा वैष्णवी महाडिक यांच्या हस्ते महिला कुस्त्यांचा आरंभ करण्यात आला. यावेळी विजेत्या महिला पैलवानास मंगलताई महाडिक यांनी पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

wrestler sikandar shaikh second time bhima kesari sport mohol
Inspiring Story : पतीच्या निधनानंतर संघर्षातून मुलाला दाखविला यशाचा महामार्ग

इतर प्रमुख किताबाचे मानकरी

भीमा सभासद केसरी-माऊली कोकाटे,भीमा कामगार केसरी-पृथ्वीराज पाटील,भीमा साखर केसरी-महेंद्र गायकवाड.प्रमुख कुस्त्यांच्या अगोदर नवोदित पैलवानांच्या नेत्रदीपक अशा एकूण ४३२ निकाली कुस्त्या पार पडल्या. यावर्षी नवोदित पैलवानांच्या कुस्त्यांमध्ये स्थानिक मल्लांचा सहभाग वाढण्यात गतवर्षीची भीमा केसरी मोलाची ठरली.

...तर महाडिक केंद्रीयमंत्री म्हणून आखाड्यात

खा. धनंजय महाडिक यांचा वाढदिवसा निमित्त नागरी सत्कारासाठी सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती लावत शुभेच्छा दिल्या. आमदार यशवंत माने म्हणाले,

आजच्या कुस्ती आखाड्यात एकाच वेळी महाडिकांच्या तीन पिढ्या असल्याचा दाखला देत खा महाडिक यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. विठ्ठलचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पुढील भीमा केसरीच्या आखाड्यात खासदार महाडिक यांनी ‘केंद्रीय मंत्री’ म्हणून उपस्थिती लावावी, यासाठी विठ्ठल चरणी साकडे घातले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com