

The Sant Surdas Divyang Wari, organised by Seva Samarpan Pratishthan, combines spiritual devotion with empowerment for visually impaired students.
Sakal
माढा : यवतमाळ येथील सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या दिव्यांग सेवा प्रकल्पाच्यावतीने मागील तीन वर्षांपासून संत सूरदास महाराज दिव्यांग ( अंध) पायीवारी ही यवतमाळ येथून पंढरपूरला येते. ५२१ किलोमीटरचाचा प्रवास हे अंध विद्यार्थी दरवर्षी करीत आहेत. दिव्यांग आश्नमातील विद्यार्थी आम्ही स्वतः अंध असल्याने पांडुरंगाला नाही पाहू शकत पण आम्ही पांडुरंगासमोर गेल्यावर पांडुरंग आम्हांला पाहत असेल या भावनेने त्यांचा हा प्रवास मागील तीन वर्षांपासून वारी करीत आहेत.