esakal | यंदा दामाजी कारखान्याचे साडेसहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : समाधान आवताडे 
sakal

बोलून बातमी शोधा

Damaji.

दामाजी कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामामध्ये साडेसहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, हंगाम यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. तोडणी ठेकेदार व कामगारांच्या सहकार्याने गाळप हंगाम यशस्वी पार पडेल, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी व्यक्त केला. 

यंदा दामाजी कारखान्याचे साडेसहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : समाधान आवताडे 

sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : दामाजी कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामामध्ये साडेसहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, हंगाम यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. तोडणी ठेकेदार व कामगारांच्या सहकार्याने गाळप हंगाम यशस्वी पार पडेल, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी व्यक्त केला. 

कारखान्याच्या 28व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ अध्यक्ष समाधान आवताडे यांच्या हस्ते व उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. संचालिका कविता निकम व त्यांचे पती भारत निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या वेळी आवताडे म्हणाले, दरवर्षी कारखान्यास नवनवीन अडचणीस सामोरे जावे लागत आहे. सध्या मशिनरीच्या दुरुस्त्या झाल्या आहेत. चालू गळीत हंगामात प्रतिदिन चार हजार मे. टन याप्रमाणे गाळप करण्याच्या दृष्टीने यंत्रणा तयार आहे. सध्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कारखानदारीवर परिणाम होईल याची जाणीव ठेवून ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा, कर्मचारी भरती केली आहे. गतवर्षी आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही इतर कारखाने चालू झाले नाहीत, परंतु दामाजीने दुष्काळी परिस्थितीमध्येही तोडणी वाहतूक यंत्रणेवरील अडचणीवर मात करून एक लाख 62 हजार मे. टन गाळप केले. 

आपण आपल्या कारखान्याची 2019-20 ची ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 2247 एफआरपी पूर्ण केली असून, दोन वर्षांपूर्वीचे राहिलेले रुपये 74 चे बिलही येत्या आठवड्यामध्ये अदा करण्यात येणार आहे. तसेच कामगारांचा पगारही बऱ्यापैकी मार्गी लागेल. मी ठरवल्याप्रमाणे कामगारांचे वेतन महिन्याच्या 10 तारखेस करण्याचे नियोजन करतो आहे. उजनी धरण शंभर टक्के भरल्यामुळे पुढील गाळप हंगामसुद्धा यापेक्षाही चांगला होणार आहे. ज्येष्ठ संचालक बबनराव आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ कामकाज करीत असून, सध्या कामकाजामध्ये आम्ही अत्यंत चिकाटी ठेवली आहे. 

कार्यक्रमास कारखान्याचे संचालक लक्ष्मण जगताप, राजीव बाबर, शिवयोग्याप्पा पुजारी, मारुती थोरबोले, रामकृष्ण चव्हाण, बाळासाहेब शिंदे, सचिन शिवशरण, स्मिता म्हमाणे, प्रा. येताळा भगत, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण मस्के, चंद्रकांत पडवळे, सरोज काझी, ऍड. धनंजय जाधव, दामाजीनगरचे सरपंच ऍड. दत्तात्रय तोडकरी, नगरसेवक रामचंद्र कौंडुभैरी, प्रमोद म्हमाणे, सुहास शिनगारे, शेती अधिकारी रमेश पवार, कार्यालय अधीक्षक दगडू फटे, लेबर ऑफिसर आप्पासाहेब शिनगारे, स्टोअर कीपर उत्तम भुसे, सुरक्षा अधिकारी लक्ष्मण बेदरे, कामगार संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड, कामगार पतसंस्थेचे अध्यक्ष विश्वास सावंजी, शेतकरी, सभासद, इतर अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top