टेंभुर्णी - शुगर बीपीच्या रुग्णांनी नियमित व्यायाम केला पाहिजे. गोळ्या औषधे नियमित घेतली पाहिजेत तसेच मन व शरीर चांगले राहण्यासाठी नियमित योग व प्राणायाम केला पाहिजे असे प्रतिपादन योग शिक्षिका पल्लवी आरकिले यांनी केले.
टेंभुर्णी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एकता महिला मंडळाच्या वतीने योग प्रशिक्षिका पल्लवी आरकिले यांच्या व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी आरकिले बोलत होत्या.
पल्लवी आरकिले म्हणाल्या की, स्त्री म्हणजे आदिशक्ती आहे. अनुलोम- विलोम,कपालभाती प्राणायाम केल्याने पोटाचे विकार कमी होतात. आजार झाल्यावर उपचारघेण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून योग प्राणायाम करणे गरजेचे आहे. योग प्राणायामाचे खूप महत्व आहे. मधुमेहसाठी अनुलोम, विलोम करावा. योग प्राणायाम केल्याने १५ दिवसात फरक पडण्यास सुरुवात होते.
लठ्ठपणासाठी बसरीका करावा. वज्रासन केल्याने पोटाचे आजार कमी होतात. योग्य प्राणायाममुळे १५ दिवसात फरक जाणवतो,चेहरा ही उजळून निघतो. घरी सहज हातपाय हलविले तरी त्याचा लाभ होतो. सर्वांनी संस्कृती जपली पाहिजे. आई-वडील पती यांचा मान ठेवला पाहिजे. यावेळी हास्य योगावर सर्वांना दिलखुलास हसविले. सर्वांनी रोज मोकळ्या मनाने हसले पाहिजे असे त्या म्हणाल्या.
यावेळी एक मुलगी अपत्यअसलेल्या अश्विनी कदम, शुभांगी गवळी, रेखा धुमाळ, नंदा बनकर यांचा तसेच जय भवानी भजनी मंडळ व श्रीराम भजनी मंडळाच्या प्रभावती यादव, मोहिनी ढगे, सुनीता सोनवणे, सुप्रिया जोशी, उर्मिला लटके, विमल कांबळे, हेमा भास्करे, शोभा भाकरे, शिलाताई गायकवाड, भागीरथी सरवदे आदी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्वाती पाटील, जयश्री ताबे, रेणुका भणगे, सुनिता पाटील, सोनल नलवडे, सुप्रिया भोसले, कल्पना बारबोले आदी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकता महिल मंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा पाटील यांनी केले. यामध्ये एकता महिला मंडळाच्यावतीने महिला पोलीस, आरोग्यसेविका, महिला ग्रामपंचायत सदस्या, सरपंच, महिला मंडळाच्या पदाधिकारी, महिला बचत गटाच्या अध्यक्षा, ग्रामपंचायतीच्या महिला सफाई कामगार, ब्युटीपार्लर यासह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील महिलांना सन्मानित करण्यात आले आहे.
गोविंद वृध्दाश्रम व पालवी (पंढरपूर) या संस्थेला एकता महिला मंडळाने मदत केली असून महिलांच्या सामाजिक व आरोग्य विषयक समस्यांवर व्याख्यान आयोजित केल्याचे प्रा. उषा पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी एकता महिला मंडळाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छाया जाधव, स्मिता पालांडे, हवाबी मुलाणी, उल्फत मुलाणी यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन संजीवनी आरबोळे यांनी केले.आभार मनिषा जांभळे यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.