esakal | शरद पवारांची क्रेझ तरुणांमध्ये आहे आजही कायम ! शेळवे येथील कार्यकर्त्याने हातावर गोंदवले "साहेबां'चे चित्र
sakal

बोलून बातमी शोधा

Saheb

वयाच्या 80 वर्षांनंतरही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, माजी कृषिमंत्री शरद पवार यांची लोकप्रियता आजही तरुणाईमध्ये कायम घर करून आहे. शेळवे (ता. पंढरपूर) येथील राष्ट्रवादीचे तरुण कार्यकर्ते अरुण आसबे यांनी आपल्या मनगटावर शरद पवार यांची तारुण्यातील प्रतिमा गोंदवून त्यांच्याप्रति असलेली कृतज्ञा व्यक्त केली आहे. 

शरद पवारांची क्रेझ तरुणांमध्ये आहे आजही कायम ! शेळवे येथील कार्यकर्त्याने हातावर गोंदवले "साहेबां'चे चित्र

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : वयाच्या 80 वर्षांनंतरही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, माजी कृषिमंत्री शरद पवार यांची लोकप्रियता आजही तरुणाईमध्ये कायम घर करून आहे. शेळवे (ता. पंढरपूर) येथील राष्ट्रवादीचे तरुण कार्यकर्ते अरुण आसबे यांनी आपल्या मनगटावर शरद पवार यांची तारुण्यातील प्रतिमा गोंदवून त्यांच्याप्रति असलेली कृतज्ञा व्यक्त केली आहे. 

अरुण आसबे हे राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव आहेत. त्यांच्या मनात शरद पवार यांच्याविषयी नितांत आदर आहे. शरद पवार हे राजकारणात येणाऱ्या तरुणांसाठी आयडॉल म्हणून ओळखले जातात. वयाची 80 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही शरद पवार यांचे अव्याहतपणे काम सुरू आहे. त्यांच्या कामाची विरोधक देखील स्तुती व कौतुक करतात. शरद पवारांची प्रेरणा घेऊन अनेक तरुण राजकारणात येऊ पाहात आहेत. अरुण आसबे हे त्यांपैकीच एक आहेत. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शरद पवारांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. 

मागील पाच वर्षांपासून ते ग्रामीण भागात राष्ट्रवादी पक्षाचे काम करत आहेत. शरद पवार यांचे विचार अधिकाधिक तरुणांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी आपल्या डाव्या हाताच्या मनगटावर शरद पवारांची तारुण्यातील प्रतिमा गोंदवली आहे. 

पुणे येथील कलाकार श्री. कोंडलकर यांनी ही प्रतिमा साकारली आहे. आठ इंच लांबीची शरद पवार यांची साकारलेली ही प्रतिमा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. आणि राजकारणातील आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी माझ्या हातावर कोरलेली शरद पवार यांची प्रतिमा उपयोगी ठरेल, असे अरुण आसबे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल