ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणांना संधी द्या ! पानगावच्या युवा वर्गाची मागणी 

Pangaon Grampanchayat
Pangaon Grampanchayat
Updated on

पानगाव (सोलापूर) : आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या तयारीला वेग येत असतानाच, या वेळी मात्र पानगाव ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक प्रभागातून तरुण व उच्चशिक्षितांना संधी मिळावी, अशी अपेक्षा आता युवा वर्गाकडून व्यक्त होत आहे. 

सन 1938 ची स्थापना असलेल्या पानगाव ग्रामपंचायतीला आजही नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात म्हणावे तसे यश आलेले नाही. अजूनही गावात रस्ते, पाणी, वीज, सांडपाणी, स्वच्छता यासाठी नागरिकांना वारंवार तक्रारी कराव्या लागतात, ही खेदजनक बाब आहे, असे सुज्ञ ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरवेळी पंचवार्षिक निवडणुकीत पारंपरिक आणि त्याच त्या उमेदवाऱ्या ठराविक प्रभागात नेतेमंडळींकडून लादल्या जात असल्यामुळे निवडून गेलेले सदस्य प्रभागातील समस्या सोडवत नाहीत. त्यामुळे अशा उमेदवाऱ्या देताना नेतेमंडळींनी या वेळी बदल करावा, अशी गावातील युवा वर्गाची मागणी आहे. 

राजकीय वैरत्वाने प्रेरित होऊन सत्तेवर आलेला गट व विरोधी गट यांच्यातील मतभेद निवडणुकीतील टीकेमुळे टोकाला गेलेले असतात. पुढे सत्ता स्थापनेनंतर गावातील विकासकामांना हे दोघेही अडथळे आणतात व जुने वैरत्व पुढे करून वादंग निर्माण करतात. परिणामी गावातील विकासकामे अनेकदा ठप्प झाली आहेत व होत आहेत, हे तरुण पिढीने प्रत्यक्षात अनुभवले आहे. त्यामुळे यापुढे उच्चशिक्षित व तरुण उमेदवारच यावर उपाय असल्याचे बहुतांश तरुणाईचे म्हणणे आहे. एकूणच, गावाला असे उमेदवार नव्याने लाभले तर गावाचा विकास वेगाने होऊ शकतो, हे मात्र नक्की आहे. 

अकार्यक्षम व्यक्ती व ठराविक पदे ठराविक लोकांकडेच वर्षानुवर्षे राहणे या गोष्टी गावाच्या विकासासाठी मारक असून, आता आगामी निवडणुकीत युवकांनी उतरणे अत्यंत गरजेचे बनले आहे. 
- सचिन मोरे,
युवा ग्रामस्थ 

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत तरुण व उच्चशिक्षित उमेदवार निवडणुकीत उभे करण्यासाठी प्रमुख नेत्यांनी प्राधान्याने प्रयत्न करावेत. गाव विकासाच्या दृष्टीने ते अत्यंत गरजेचे आहे. 
- देवा काळे,
युवा ग्रामस्थ 

ग्रामपंचायतीत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उच्चशिक्षित युवा वर्ग असणे हिताचे राहील. कोणत्याही वैर भावनेशिवाय जनहिताचे काम करणे हे त्यांच्याकडून सहज शक्‍य आहे. 
- राजेश वाघे,
युवा ग्रामस्थ 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com