

सोलापूर : पोटेगाव (ता. करमाळा) येथील नातेवाइकांच्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला आलेला तरुण दुसऱ्या दिवशी १४ मे रोजी दुचाकीवरून पुण्याला निघाला. दत्तात्रय दगडू मोरे (वय २४) याला परांडा ते करमाळा रोडवरील आवाटी दर्ग्याजवळ दोघांनी अडविले. त्यांनी बंदूक दाखवून गळ्यातील एक लाख ६० हजार रुपयांची सोन्याची चेन हिसकावून घेतली, अशी फिर्याद त्याने करमाळा पोलिसांत दिली आहे.