
बेगमपूर (सोलापूर) : जकराया साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात सात लाख मेट्रिक टन ऊस गळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, यासाठी आवश्यक यंत्रणेशी करार झाले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी दिली. वटवटे (ता. मोहोळ) येथील जकराया साखर कारखान्याकडून यंदाच्या गळीत हंगामासाठीच्या (2020-21) मिल रोलरचे पूजन कारखान्याचे संस्थापक- अध्यक्ष ऍड. बी. बी. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पूर्ण वेळ संचालक राहुल जाधव उपस्थित होते.
श्री. जाधव म्हणाले, यंदा गाळपाची पूर्वतयारी नियोजनबद्ध केली आहे. शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपाला यावा यासाठी तोडणी यंत्रणा सक्षम ठेवली आहे. यासाठी कारखान्याने 200 ट्रॅक्टर, 590 बैलगाड्या, 200 डम्पिंग व दहा तोडणी मशिन यंत्रांशी करार करण्यात आले आहेत. कारखान्याने उपपदार्थ निर्मिती प्रकल्पालाही विशेष प्राधान्य दिले असून, त्याची कामेही प्रगतिपथावर आहेत.
कारखान्याने यंदा सात लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, कार्यक्षेत्रातील उपलब्ध ऊस व सभासदांचा विश्वास यामुळे हे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण होईल. सभासदांबरोबरच बिगर सभासदांनी दराबाबत निश्चिंत राहून यंदाही गळितासाठी कारखान्याला सहकार्य करावे, असे आवाहान सचिन जाधव यांनी केले. या वेळी मुख्य शेती अधिकारी श्री. बाबर, केन मॅनेजर विजय महाजन, वर्क्स मॅनेजर एस. एस. महामुनी, चीफ केमिस्ट डी. एन. आवताडे, डिस्टिलरी मॅनेजर के. सी. कोटकर व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.