dcm eknath shinde and charanraj chavare
sakal
मोहोळ - आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 1 व 2 अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून, नागरिकांसह जनावरांनाही पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य चरणराज चवरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे.