सैनिकाने बनवल्या टाकाऊ प्लास्टिकच्या विटा 

शैलेश पेटकर - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

सांगली - पर्यावरणासमोरची भयावह समस्या बनलेल्या प्लास्टिकचे करायचे काय यावर अनेक बाजूनी विचार होत असताना भारतीय सेनादलातील एका जवानाने प्लास्टिक वितळवून पक्‍क्‍या विटा तयार करण्याचा प्रयोग केला आहे. प्राथमिक स्तरावर असलेल्या या प्रयोगातून एका मोठ्या समस्येचे उत्तर मिळू शकते. मूळचा खुजगाव (ता. तासगाव) येथील असलेल्या या अवलिया जवानाचे नाव सचिन संदीपान देशमुख आहे. या विटांपासून पक्के रस्ते, फूटपाथ उभारले जाऊ शकतात असा त्याचा दावा आहे. 

सांगली - पर्यावरणासमोरची भयावह समस्या बनलेल्या प्लास्टिकचे करायचे काय यावर अनेक बाजूनी विचार होत असताना भारतीय सेनादलातील एका जवानाने प्लास्टिक वितळवून पक्‍क्‍या विटा तयार करण्याचा प्रयोग केला आहे. प्राथमिक स्तरावर असलेल्या या प्रयोगातून एका मोठ्या समस्येचे उत्तर मिळू शकते. मूळचा खुजगाव (ता. तासगाव) येथील असलेल्या या अवलिया जवानाचे नाव सचिन संदीपान देशमुख आहे. या विटांपासून पक्के रस्ते, फूटपाथ उभारले जाऊ शकतात असा त्याचा दावा आहे. 

सचिनने या प्रकल्पावर 2008 पासून काम सुरू ठेवले आहे. त्याच्या या कल्पनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे त्याने स्वतःच असे मशीन तयार करण्याचा निर्णय घेतला आणि तयारी सुरू केली. नोकरी, जागा, पैसा अशा अनेक अडचणी होत्या. मात्र त्याच्या या प्रयोगाला मदतीसाठी सेनादलातीलच कर्नल ए. सी. कुलकर्णी आणि कर्नल करण धवन धावून आले. त्यांच्या आर्थिक सहकार्यातून वर्षभराच्या प्रयत्नांती "वेस्ट प्लास्टिक प्रॉडक्‍ट' मशीन तयार झाले. त्याच्या पेटंटसाठी नोंदणीही त्याने केली आहे. यात प्लास्टिक वितळवण्यापासून मोल्डिंगपर्यंतची व्यवस्था त्यात केली. जालंदर (पंजाब) येथे सेनादलाच्या सेवेतच केलेल्या या मशिनसाठी अवघे 20 हजार रुपयांचा खर्च आला. कचऱ्याचा कायमस्वरूपी पुनर्वापर आणि रोजगार हा दुहेरी हेतूने या प्रयोगाचे सार्वत्रिकरण व्हावे असा सचिनचा हेतू आहे. त्याच्या या प्रयत्नांना उद्योजक माधव कुलकर्णी, शिवाजी देशमुख, प्रदीप पवार, नारायण देशमुख, तानाजी देशमुख, अमर जमदाडे, प्राचार्य एस. एन. सावंत अशा अनेकांनी आता मदतीचा हात देऊ केला आहे. 

प्लास्टिक विटांबद्दल 
15 बाय 6 इंचाचे ब्लॉक बनवण्यासाठी सुमारे दोन किलो प्लास्टिक कचरा लागतो. 150 अंश सेल्सिअसला त्याचे हायड्रोलिक मशीनद्वारे मोल्डिंग केले जाते. मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक एकत्रित झाल्यामुळे या ब्लॉकची मजबुती 20 न्युटॉन इतकी आहे. साध्या मातीच्या विटेची मजबुती 3 न्युटॉन इतकी असते. या ब्लॉकच्या चाचणीसाठी सात टनांचा ट्रक नेऊन पाहिला. त्यातून पेव्हिंग ब्लॉक्‍स्‌, फूटपाथ, रस्त्यावरील दुभाजक, रेल्वे रुळावरील स्लीपर्ससाठी उपयोग होऊ शकतो. देशातील प्रमुख 60 शहरांत दररोज 15 हजार टन प्लास्टिकचा कचरा तयार होतो. त्यापैकी 9 हजार टनांचा पुनर्वापर होतो; पण 6 हजार टन कचरा तसाच बाकी राहतो. एका विटेसाठी दहा रुपये खर्च येतो. त्यामुळे शिल्लक दररोज 6 हजार टन प्लास्टिकवर प्रक्रिया झाली तर सुमारे 2 हजार 190 कोटींचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. 

या विटेवर दहा टनांपर्यंत दाब देऊन चाचणी घेतली आहे. या प्रयोगाची माहिती मी नुकतीच लेफ्टनंट कर्नल हेमंत जोशी यांना दिली. त्यांनी या प्रयोगाची तज्ज्ञामार्फत प्रसिद्धी व चाचणी करून आम्ही या विटांचा सीमेवर चौकी, बंकर उभारण्यासाठीही करू. या विटांचा वापर बंकरसाठी केला तर गोळीबारादरम्यान सैनिकांना कमी दुखापती होतील असे जोशींचे निरीक्षण आहे. आम्हीही सांगलीत महापालिकेच्या परवानगीने या विटांचे एखादे आयलॅंड उभे करू.'' 
माधव कुलकर्णी, उद्योजक, सांगली.

Web Title: Solider made waste plastic bricks