
चिखलठाण : पुणे व सातारा जिल्ह्यांतील बैलगाडा शर्यतीचे आकर्षण सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातही आहे. आजपर्यंत अनेक शर्यतींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून लोकांची मने जिंकणारा, तालुक्यातील उमरडच्या गणेश मारकड यांनी खास शर्यतीसाठी सांभाळलेल्या सोन्या बैलाचा तालुक्यातील लोकांना चांगलाच लळा लागला असून, या बैलाची शर्यत पाहण्यासाठी तालुक्यातील विविध गावांतील तरुण आवर्जून शर्यतीच्या ठिकाणी हजेरी लावत असतात. \