सांगली : एरवी सत्तेच्या राजकारणापासून दोन हात दूर राहिलेल्या दक्षिण भारत जैन सभेत (South India Jain Sabha) आता सत्ताकारण आणि वर्चस्ववादाची लढाई सुरू झाली आहे. माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यातील वर्चस्वाची छुपी लढाई आणि त्यात माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी घेतलेला सहभाग, यामुळे समाजाच्या शिखर संस्थेच्या अध्यक्ष निवडीवरून तणाव निर्माण झाला आहे.