शेतात पेरलं पण,  उगवलंच नाही ः पहा कुठे 

सतीश अजमाने 
Tuesday, 7 July 2020

उमदी (सांगली) ः एकीकडे कोरोणाचे थैमान तर दुसरीकडे बोगस बियाणांचा सुळसुळाट, यामुळे दुष्काळी जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. भुईमूग, बाजरी, मका पिकांच्या बोगस बियाणांमुळे "पेरलं पण उगवलच नाही' नाही अशी जत तालुक्‍यातील पूर्व भागातील परिस्थिती आहे.

उमदी (सांगली) ः एकीकडे कोरोणाचे थैमान तर दुसरीकडे बोगस बियाणांचा सुळसुळाट, यामुळे दुष्काळी जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. भुईमूग, बाजरी, मका पिकांच्या बोगस बियाणांमुळे "पेरलं पण उगवलच नाही' नाही अशी जत तालुक्‍यातील पूर्व भागातील परिस्थिती आहे.

तालुक्‍यातील अनेक भागात शेतशिवारात शेतकऱ्यांनी पेरलेले बाजरी, भुईमूग बियाणे उगवत नसल्याचा प्रकार समोर येत आहे. जत तालुक्‍यात यावर्षी भुईमूग, बाजरी, मका पिकाच्या बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झाल्याचे समोर येत आहे. तालुक्‍यातील पुर्व भागासह सर्वदूर भागातून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणांच्या तक्रारी येत आहेत. तालुक्‍यातील अनेक भागात शेतशिवारात शेतकऱ्यांनी पेरलेले भुईमूग व बाजरी ची बियाणे उगवत नसल्याचा प्रकार समोर येत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी उगवण क्षमता नसणाऱ्या बियाणांच्या शेतात दुबार पेरणीसाठी नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. जत पुर्व भागासह तालुक्‍यात सर्वत्रच हा पेरणी लायक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी विविध जातींची बियाणे विकत आणून पेरणी केली. मात्र पेरलेले बियाणे उगवलेच नाही. तर काही ठिकाणी बियाणे अल्प क्षमतेने जमिनीवर उगल्याचे दिसत आहे.त्यामुळे दुबार पेरणीशिवाय शेतकऱ्यांना आता पर्याय राहिलेला नाही.

अगोदरच लॉकडाऊनमुळे शेतमालाच्या मालाचे भाव पडले आहेत. त्यातच आता पेरलेले धान्य न उगवल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी आर्थिक अडचणींचा सामना लागणार आहे. 
बोगस बियाणांची विक्री करणाऱ्या जत शहरातील नामांकित एका दोषी विक्रेत्याला स्वतःआमदार विक्रमसिंह सावंत यांनी फोन करून पोलखोल केल्याने विक्रेत्यांने त्या शेतकऱ्यांची पैसे वापस केले आहे,

तर ह्या बोगस विक्रेत्यांना पाठीशी घालणारे कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांची कान उघडणी करत कुठल्याही दुकानदारांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होता कामा नये अशी सक्त सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. 

 

जत तालुक्‍यातील कृषी विभाग व कृषी सेवा केंद्र यांचे साटेलोटे आहे. त्यामुळे बोगस बियाणे मोठ्या प्रमाणात विक्री केले जात आहे. कृषी अधिकाऱ्यांनी उगवण झालेले बियाणे दाखवावे मी त्या बियाणांचे पैसे देतो. 

फिरोज मुल्ला 
राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sown in the field but not grown: see where