Soyabean breaks down in Talegaon
Soyabean breaks down in Talegaon

तळेगावात पावसाने सोयाबीनला फुटले मोड

तळेगाव दिघे (ता. संगमनेर) : सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या भीज पावसाने सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी चिंताक्रांत बनले. शेतात दलदल निर्माण झाल्याने अक्षरशः पिके सडली, तर अनेकांच्या शेतातील सोयाबीनच्या शेंगांना मोड फुटले.


अवर्षणप्रवण तळेगाव भागात परतीच्या संततधार पावसाचा बाजरी, सोयाबीन, मका व भुईमूग या खरीप पिकांना मोठा फटका बसला. सर्वाधिक नुकसान काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाचे झाले. शेतात पावसाचे पाणी साचून दलदल निर्माण झाल्याने शेतातच पिके सडली. हातातोंडाशी आलेले शेतकऱ्यांचे सोयाबीनचे उत्पन्न बुडाले. शेतातच सोयाबीनच्या शेंगांना फुटलेले मोड पाहून अनेक शेतकऱ्यांना रडू कोसळले.

तळेगाव दिघे, चिंचोली गुरव, देवकौठे, नान्नज दुमाला, वडझरी, कासारे, लोहारे सहित परिसरात पावसाचा पिकांना फटका बसला. शासनाने सोयाबीनसह खरीप पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत व नुकसान झालेल्या खरिपाची शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी संगमनेर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश सोनवणे व राजहंस ट्रान्स्पोर्टचे अध्यक्ष हौशीराम सोनवणे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com