
म्हणून अशा विषाणुजन्य व्याधींसाठी लस परिणामकारक कार्य करेल, असे वाटते आहे.
सांगली : विज्ञानाने काही व्याधींविरोधी लसी शोधल्या. ते व्याधींविरोधी कवच उपलब्ध झालेले आहे. जीवाणूमुळे होणाऱ्या व्याधींवर अनेक औषधे उपलब्ध असल्यामुळे ते व्याधी बरे करणे सोपे आहे. तथापि विषाणूंमुळे होणारे पोलिओ, एड्स, कोरोनासारख्या व्याधी औषधांमुळे बरे करणे अवघड आहे. म्हणून अशा विषाणुजन्य व्याधींसाठी लस परिणामकारक कार्य करेल, असे वाटते आहे.
कोरोनाही विषाणुजन्यच व्याधी आहे. त्यावर सध्यातरी खात्रीशीर औषधे उपलब्ध नाहीत. म्हणूनच मग त्यासाठी जगात संशोधन सुरु झाले. वर्षभराच्या अथक प्रयत्नांमुळे आता देशोदेशीच्या शास्त्रज्ञांना लस तयार करण्यात यश आले आहे. या लसींबाबत मानवी शरीरावरील त्रिस्तरीय खडतर चाचण्या पार पडून लसींची अधिकाधिक उपयुक्तता आणि कमीतकमी उपद्रवमूल्यता साधण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. हे जेव्हा संबंधित यंत्रणांसमोर सिद्ध होते तेव्हाच शासकीय यंत्रणांकडून लस वापरण्यास मान्यता मिळत असते.
हेही वाचा - अभियांत्रिकीत प्रात्यक्षिक प्रभावशाली -
लस घेतल्यानंतर आपल्या शरीरात कोरोना विषाणूंविरोधी रोगप्रतिकारक शक्ती तयार होवून राहते. त्यामुळे,जर भविष्यात आपल्या शरीरात कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग झाला तर ही रोगप्रतिकारक यंत्रणा त्यांच्या विरोधी काम करु लागते. त्या परजीवी विषाणूंचा नाश करण्यात यश येवून आपण कोरोना पासून बचावू शकतो. आपल्याकडेही ते सुरु झाले आहे.
टप्प्या टप्प्याने लसीकरणाचे सार्वत्रिकरण होईल.
सध्या आपल्याकडे कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झालेले आहे, हे खरे आहे, तरीही आपण सोशल डिंस्टन्सिग पाळणे, योग्य मास्क योग्य रीतीने वापरणे, सॅंनिटायझर/साबणाचा वारंवार वापर करणे, अनावश्यक प्रवास टाळणे, गर्दी न करणे या गोष्टींचे पालन करीतच राहूया.
सध्या यावरच आपले लक्ष हवे.नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी संत्री, मोसंबी, लिंबू, आवळा, च्यवनप्राश असे क जीवनसत्व युक्त फळांचे सेवन नियमित करीत राहूया. प्रतिकार शक्ती म्हणजे पी हळद आणि हो गोरी असा काही प्रकार नसतो. आहार हलका, पुरेसा, नियमित घ्या. दररोज प्राणायाम, आसने, फिरण्यासारखा व्यायाम कायमच ठेवा. हाच त्यासाठी शाश्वत मार्ग आहे. यापासून सुटका नाही.
हेही वाचा - विशेष म्हणजे त्यांनी माजी सरपंचांच्या पत्नीलाच धक्का दिला
संपादन - स्नेहल कदम