सोलापूरचा पाऊस नोंदवण्यासाठी खास रडार 

रजनीश जोशी
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) संकेतस्थळावर आता सोलापूरच्या आकाशातील ढग, पावसाची छायाचित्रे दिसत आहेत. त्यासाठी खास रडारची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे वेळापत्रकानुसार विशिष्ट अंतराने काढली जाणारी छायाचित्रे सर्वसामान्य जनतेला पाहता येतील. 

ःसोलापूर- भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) संकेतस्थळावर आता सोलापूरच्या आकाशातील ढग, पावसाची छायाचित्रे दिसत आहेत. त्यासाठी खास रडारची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे वेळापत्रकानुसार विशिष्ट अंतराने काढली जाणारी छायाचित्रे सर्वसामान्य जनतेला पाहता येतील. 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीच्या वतीने (आयआयटीएम) सोलापूर या पर्जन्यछायेतील प्रदेशात कृत्रिम पाऊस पाडण्यासंबंधी प्रयोग सुरू आहेत. त्यासाठी रडारवरील छायाचित्रे उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण ठरत आहेत. महाराष्ट्रात मुंबई व नागपूर येथे अशी यंत्रणा आहे. देशात सर्वाधिक पाऊस पडणारे चेरापुंजी, पर्वतीय प्रदेश असलेले श्रीनगर आणि पर्जन्यछायेत असलेले सोलापूर एकाचवेळी पाहता येतील. सोलापूरची सहा छायाचित्रे या संकेतस्थळावर पाहता येतील. प्लॅन पोझिशन इंडिकेटरद्वारे ढगांची स्थिती, सरफेस रेनफॉल इंटेन्सिटी आणि प्रेसिपिटेशन ऍक्‍युमिलेशन अर्थात पर्जन्यसंचयाची माहिती मिळते. याखेरीज प्रक्रियेच्या माहितीचा आराखडाही पाहायला मिळतो.

कृत्रिम पावसाचा प्रयोग सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे. हा केवळ प्रयोग असून त्याद्वारे पर्जन्यछायेतील प्रदेशातील अवकाश, ढग आणि पावसाच्या शक्‍यतांचा अभ्यास केला जात आहे. कृत्रिम पावसाच्या अभ्यासासाठी हे प्रयोग सुरू आहेत. त्यासाठी सोलापूर विमानतळावर विमाने व अन्य यंत्रणा तैनात आहे. 

"आयआयटीएम'च्या वतीने कृत्रिम पावसाचा प्रयोग सोलापूराच्या आकाशात केला जात आहे. त्यासाठी लागणारी विमाने व अन्य उपकरणे विमानतळावर आहेत. त्याच्या सुरक्षेची जबाबदारी "आयआयटीएम'च्या संचालकांच्या विनंतीवरून आपण संबंधित खात्यावर सोपवली आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यावेळी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special Radar for record Solapur Rain