#RECRUTMENT : `या` प्रवर्गातील उमेदवारांची सोलापूर महापालिकेत भरती 

#RECRUTMENT : `या` प्रवर्गातील उमेदवारांची सोलापूर महापालिकेत भरती 
Updated on


सोलापूर : अनुसूचित जमाती प्रवर्गातील (एसटी) अधिसंख्य पदे भरण्यासाठी सोलापूर महापालिकेने इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. एकूण 43 जागा भरण्यात येणार असून त्यामध्ये विविध श्रेणीतील पदांचा समावेश आहे. त्यासाठीची अर्ज विक्री आजपासून (शुक्रवार) सुरु झाली असून, 27 जानेवारीपर्यंत सायंकाळी पावणेसहापर्यंत स्वीकारले जाणार आहेत. या जागांसाठीची लेखी परिक्षा 9 फेब्रुवारी 2020 रोजी होणार आहे. 

हेही वाचा - दरवर्षी नेतात पैसे, पण... 

म्हणून केले कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त 
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार अनुसूचित जमातीचे वैध प्रमाणपत्र न दिलेल्या कर्मचार्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. मात्र त्यांना 11 महिन्यांच्या करारावर नियुक्ती दिली गेली आहे. दरम्यान, रिक्त पदावर भरती करण्यासाठी महापालिकेने विशेष मोहिम राबविली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत.  अनुसूचित जमाती (एस.टी.) या प्रवर्गातील राज्यातील सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांची सेवा 31 डिसेंबर 2019 पासून थांबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र मोठ्या संख्येने असलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची वेळ येऊ नये यासाठी त्यांना तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्यांची नेमणूक देण्यात आली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही 
बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे आदिवासींच्या अधिकारांवर घाला घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 6 जुलै 2017 रोजी दिला होता. मात्र, या निर्णयाला राज्य सरकारने निवडणुका जवळ आल्याने दुर्लक्ष केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला खडे बोल सुनावत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 31 डिसेंबर 2019 पर्यंतचा वेळ दिला होता. अखेरीस सर्वोच्च न्यायालयाला 31 डिसेंबर 2019 पूर्वी या कर्मचारी अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, याचा अहवाल सादर करावयाचा असल्याने मंत्रिमंडळाने तसा निर्णय घेतला. 

अधिसंख्य पदांची होणार निर्मिती 
सरकारची दिशाभूल करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कशाप्रकारे कारवाई करता येईल, सेवाविषयक आणि सेवानिवृत्तीविषयक लाभांबाबत सविस्तर अभ्यास करून शासनास शिफारशी करण्यासाठी स्वतंत्र मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली आहे. खऱ्या आदिवासींना सरकारी सेवेचा अधिकार मिळावा, त्यासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जावी, ही त्यामागची भूमिका असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
 

या जागांसाठी होणार भरती (कंसात संख्या)
स्थापत्य अवेक्षक - कनिष्ठ अभियंता (3), वीज पर्यवेक्षक, सहायक आरेक्षक, शिक्षण सेवक, अनुरेखक, लॅम्पलायटर (प्रत्येकी एक), 
कनिष्ठ श्रेणी लिपीक (8), मिडवाईफ, वाहनचालक व माळी (प्रत्येकी दोन), शिपाई (7) आणि मजूर (3). इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी  www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why is Sagareshwar Wildlife Sanctuary famous?
Why are women paying extra for NCMC cards?
Devendra Fadnavis Sunil Tatkare Jayant Patil meeting
Who is Tukaram Mundhe?
Marathi News Esakal
www.esakal.com