रखडलेल्या घाटनांद्रे टेंभू योजनेच्या कामाला गती 

हिरालाल तांबोळी
Monday, 30 November 2020

घाटमाथ्याला वरदान ठरणाऱ्या बहुचर्चित व कित्येक वर्षापासून रखडलेल्या टेंभू योजने अंतर्गत घाटनांद्रे उपसा जलसिंचन योजनेच्या कामाने काही दिवसांपासून गती घेतली आहे. नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. 

घाटनांद्रे : घाटमाथ्याला वरदान ठरणाऱ्या बहुचर्चित व कित्येक वर्षापासून रखडलेल्या टेंभू योजने अंतर्गत घाटनांद्रे उपसा जलसिंचन योजनेच्या कामाने काही दिवसांपासून गती घेतली आहे. नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. 

याबाबतची माहिती अशी, की टेंभू योजने अंतर्गत घाटमाथ्याला वरदान ठरणारी घाटनांद्रे उपसा सिंचन योजना ही टप्पा क्र. पाच अंतर्गत भूड येथून पाणी उचलून तामखडी, खानापूर, पळशी, घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, कुंडलापुर, गर्जेवाडी, शेळकेवाडी, केरेवाडी, जाखापूर, डोंगरसोनीला पाणी देण्यासाठी ही योजना आहे. घाटनांद्रे(ता.कवठेमहंकाळ) व डोंगरसोनी (ता.तासगांव) येथे योजनेचे जल्लोषात भूमिपूजन झाले. 

तत्कालीन अधिक्षक अभियंता गुणाले व कार्यकारी अभियंता कडुसकर यांनी मे 2019 पर्यंत ही योजना कार्यान्वित होईल, असे आश्वासन दिले. तद्नंतर योजनेचे काम मंद गतीने सुरु होते. तिच्या पूर्णत्वासाठी रास्ता आंदोलनही झाले. त्यानंतर काही ठिकाणी पाईप आणून टाकल्या. काही ठिकाणी चरी काढून ठेवल्या. काही ठिकाणच्या पाईप उचलून नेल्यामुळे योजनेबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. 

दुष्काळाने बेजार घाटमाथ्यावरील जनतेचे डोळे योजनेच्या पुर्ततेकडे लागले होते. योजनेसाठी खोदलेल्या चरींमुळे शेतकऱ्यांना पेराही करता आला नव्हता. तरीही बळीराजा पाण्याच्या प्रतीक्षेत व परीसरात नंदनवन फुलणार या अपेक्षेने योजनेच्या पूर्णत्वाकडे टक लावून आहे. 

योजनेच्या कामाने सध्या गती घेतली आहे. चरी काढुन पाईप बसवण्याचे काम सुरू आहे. उर्वरित भागासाठी नविन पाईपही येऊ लागल्यात. घाटमाथ्यावरील जनतेत फिलगुडचे वातावरण आहे. 

काम जरी रखडले असले तरी खासदार संजय पाटील यांच्यामार्फत मोठे प्रयत्न सुरू होते. आता सर्वच काम मार्गी लागून जानेवारी अखेरीस पाण्याची चाचणी होईल. 

-अनिल शिंदे, माजी उपसभापती, कवठेमहंकाळ

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Speed ​​up work on the stalled Ghatnandre Tembhu scheme