पक्षी अध्ययन केंद्रास मिळणार गती 

पक्षी अध्ययन केंद्रास मिळणार गती 

कऱ्हाड - जिल्ह्यात जवळपास अडीचशेहून जास्त पक्ष्यांच्या वेगवेगळ्या जाती आढळतात. पाटण, कोयना, महाबळेश्वरसह जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही पक्षी निरीक्षकांनी वेगवगळ्या जातीच्या पक्ष्यांची नोंद केली आहे. दहा वर्षांतून नोंदी केल्या जातात. त्याप्रमाणे जिल्ह्यात 254 हून अधिक जाती आहेत. पश्‍चिम घाटाचा भाग असलेल्या जिल्ह्यात पक्ष्यांची संख्या लक्षणीय आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात कऱ्हाड, पाटण, कोयनेच्या पट्ट्यात वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आढळतात. त्यामुळे या भागात पक्षी अध्ययन केंद्रासाठी प्रयत्न सुरू आहेत. उद्या (शुक्रवार) येथे सुरू होणाऱ्या अखिल भारतीय पक्षिमित्र संमेलनातून त्या संकल्पनेस चालना मिळल्यास पक्ष्यांच्या अभ्यासाला गती येण्याची शक्‍यता आहे. 

कोयना अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान यांना मिळून झालेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जैवविविधतेला व त्या अनुषंगाने येथील बिबटे, वाघ व अन्डेमिक म्हणजे फक्त याच भागात आढळणाऱ्या प्रजाती यांना संरक्षण देणे, हाच प्रमुख हेतू आहे. जगातील संवदेनशील म्हणून पश्‍चिम घाटात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा समावेश आहे. पश्‍चिम घाटच महत्त्वपूर्ण असून, सध्या अनेक समस्या येथील पर्यावरणाला व जैवविविधतेला भेडसावत आहेत. वाघ हाच केंद्रस्थानी ठेऊन येथील जैवविविधतेचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तापमान वाढीचा विचार करता अवैध जंगल तोड, अवैध खाणकाम, शिकार, जंगलातून होणारे घाटरस्ते याचा दूरगामी परिणाम पुढच्या पिढीला भोगावा लागेल. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून येथे होणाऱ्या पक्षिमित्र संमेलनातून येथे पक्षी अध्ययन केंद्र सुरू होण्याची दाट शक्‍यता समोर येत आहे. त्या माध्यमातून शासन पुढाकार घेण्याची शक्‍यता आहे. त्या पुढाकारातून पक्षी अध्ययन केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न शासन पातळीवर वन खात्याकडून सुरू आहे. त्याला राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनीही दुजोरा दिला आहे. 

पश्‍चिम घाटात 500 वेगवेगळ्या जातींच्या पक्ष्यांची नोंद आहे. त्यापैकी जवळजवळ 275 प्रजातींची नोंद सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आहेत. पश्‍चिम घाट प्रदेशात जगात आढळणाऱ्या जातीही येथे उपलब्ध आहेत. तशा सुमारे 13 जातींचे पक्षी येथे आहेत. ते फक्त आपल्याच भागात आढळतात. त्या सगळ्या पक्ष्यांचा अभ्यास सुरू आहे. त्यानुसार त्यांना संरक्षण देण्यासाठी काहीतरी हालचाली संमेलनाच्या माध्यमातून होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सह्याद्री पट्टा हा जैवविविधतेने समृद्ध आहे. त्याला जगात मान्यता आहे. या भागात पक्षी, प्राणी व अन्य प्रजाती येथे आहेत. जलसाठे, नद्यांचे उगम या सोबतच अद्वितीय पर्यावरण प्रणाली राज्याच्या आर्थिक विकासाचा पाया ठरते आहे. या सगळ्या पातळीवरील अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. त्याबाबतही अभ्यास सुरू आहे. प्रकल्पात वाघांसमवेत तेथील अनेक सस्तन प्राण्यांना आसरा मिळाला आहे. भारतात आढळणाऱ्या चारशेपैकी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात आजमितीस 36 पेक्षा जास्त मांसभक्षी व तृणभक्षी सस्तन प्राण्यांची नोंद आहे. 

आपल्या भागातील पक्षी 
भारतात पक्ष्यांच्या जवळपास एक हजार 200 जातींची नोंद आहे. त्यात पश्‍चिम घाट प्रदेशात आजतागायत 500 हून अधिक विविध जातींच्या पक्ष्यांची नोंद आहे. निळ्या पंखांच्या पोपटासारख्या म्हणजे ब्लू विंगड पाराकीतसारख्या काही जाती आहेत की, ज्या फक्त जगात पश्‍चिम घाटातच आढळतात. त्यापैकी जवळपास सातारा जिल्ह्यात 250 प्रकारच्या विविध जातींची नोंद आहे. त्याबाबत मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सतत 15 वर्षांहून अधिक काळ पक्षी निरीक्षण व संवर्धन केले आहे. त्यांनीही त्याच्या नोंदी ठेवल्या आहेत. अहवालही शासनाला पाठवला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com