esakal | भररस्त्यावरच थरार ; आटपाडीत पत्नीकडून पतीचा धारदार शस्त्राने खून :sangli crime news
sakal

बोलून बातमी शोधा

किरकोळ वादातून पतीचा पत्नीवर चाकूहल्ला

भररस्त्यावरच थरार ; आटपाडीत पत्नीकडून पतीचा धारदार शस्त्राने खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आटपाडी (सांगली) : गोमेवाडी (ता.आटपाडी) येथे श्रीराम मंदिरासमोर मुख्यरस्त्यावरच सकाळी साडेआठ वाजता वादातून महिलेने तिच्या पतीचाच जमावासमोर चाकूने वार करून आणि डोक्यात दगड घालून ठेचून निर्घृण हत्या केली. श्रीकांत श्रीपती खरात (वय. ४४) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी वैशाली श्रिकांत खरात (वय.३४) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

यासंबंधी पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की,

श्रीकांत श्रीपती खरात मूळचा तासगावचा तर पत्नी वैशालीचे माहेर कर्नाटकात आहे. गोमेवाडी हे वैशालीचे आजोळ आहे. गोमेवाडीत दोघे श्रीराम मंदिरासमोर दोन पत्र्याच्या खोल्या घेऊन राहत होते. श्रीकांत टेलरिंगचा व्यवसाय करत होता. त्यांना सतरा वर्षाचा एक मुलगा आणि अकरा वर्षाची एक मुलगी आहे.

दोन वर्षांपासून दोघांच्यात सतत भांडण, वादावादी आणि किरकोळ हाणामारी होत होती. श्रीकांत पत्नी वैशालीवर चारित्र्याचा संशय घेत होता. यावरून दोघांच्यात अनेक वेळा कडाक्याचे भांडणे झाली आहेत. श्रीकांतला दारूचे व्यसन होते. सततच्या भांडणांमुळे दोघेही दीड वर्षापासून जवळ जवळ असलेल्या खोल्यांत विभक्त राहत होती.

काल सकाळी सव्वा आठच्या दरम्यान दोघांच्यात चारित्र्याच्या संशयावरून कडाक्याचे भांडण लागले. श्रीराम मंदिरासमोर मुख्य रस्त्यावरच श्रीकांत हातात चाकू घेऊन वैशालीला मारण्यासाठी धावून गेला. दोघांच्यात झटापट झाली. या गोधंळाने बघ्यांनी गर्दी केली होती. वैशालीने श्रीकांतच्या हातातील चाकु घेऊन त्याच्या पायावर चाकूने वर्मी घाव घातला. जखमी श्रीकांत ओरडत रस्त्यावर कोसळला. संतापलेल्या वैशालीने कसलाही विचार न करता रस्त्यातकडेचा मोठा दगड उचलून डोक्यात घातला. यावेळी जमलेल्या जमावातील लोकांनी तिला दगड डोक्यात मारू नको, असे अनेकांनी सांगितले पण तिने कोणाचेही न ऐकता दोन-तीन वेळा डोक्यात मोठा दगड घालून हत्या केली.

डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला. घटनास्थळावर तिचा मुलगा, वैशालीची तिची आई, आजी आणि बरेच होते. हत्या करून वैशाली तेथेच जवळ खुर्चीवर निवांत बसली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील शामराव पाटील घटनास्थळी आले. त्यांनी श्रीकांतच्या प्रेतावर चादर टाकून झाकले आणि पोलिसांना याची माहिती कळवली. आटपाडी पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. विच्छेदनासाठी श्रीकांतचे शव आटपाडीला नेहले तर वैशाली हिला ताब्यात घेतले. या घटनेची आटपाडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

loading image
go to top