सोलापुरात महाजनादेशयात्रेमुळे स्टेडियमची दुरावस्था; काँग्रेसकडून प्रश्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

आत्ता क्रीडाप्रेमींना, खेळाडूंना या मैदानावर खेळता येत नाही, याचा निषेध म्हणून सोलापूर शहर युवक काँग्रेस वतीने प्रतिकात्मक क्रिकेट सामना खेळला गेला. आठ दिवसात मैदान पूर्ववत करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी युवक काँग्रेसकडून देण्यात आला.

सोलापूर : भाजपच्या महाजनादेश यात्रेमुळे सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमची दुरावस्था झाली असून, स्टेडियमच्या दुरुस्तीचा खर्च भाजप उचलेल का? की कर्जबाजारी महाराष्ट्र सरकारवरच बोजा टाकणार असे प्रश्न युवक काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आले आहेत. 

सोलापुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क मैदान) येथे महाजनादेश यात्रेचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी स्टेज व मंडपसाठी पूर्ण मैदानात खड्डे मारण्यात आले. त्यात अधून मधून येणारा पाऊस त्यामुळे मैदानात चिखलच चिखल झाला आहे. त्यामुळे मैदानाची दुरावस्था झालेली दिसत आहे.

आत्ता क्रीडाप्रेमींना, खेळाडूंना या मैदानावर खेळता येत नाही, याचा निषेध म्हणून सोलापूर शहर युवक काँग्रेस वतीने प्रतिकात्मक क्रिकेट सामना खेळला गेला. आठ दिवसात मैदान पूर्ववत करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी युवक काँग्रेसकडून देण्यात आला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stadium damaged in Solapur because of BJP Mahajanadesh Yatra