दिवाळीपूर्वी मंदिरे, प्रार्थना स्थळे सुरु करा...भाजपा अध्यात्मिक आघाडीच्यावतीने आंदोलन

बलराज पवार
Tuesday, 10 November 2020

सांगली-  लॉकडाऊनपासून बंद असणारी मंदिरे, प्रार्थना स्थळे दिवाळीपूर्वी सुरु करण्यासाठी आज अध्यात्मिक आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

सांगली-  लॉकडाऊनपासून बंद असणारी मंदिरे, प्रार्थना स्थळे दिवाळीपूर्वी सुरु करण्यासाठी आज अध्यात्मिक आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

जनतेची श्रद्धास्थाने असणारी धार्मिक स्थळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहेत. इतर राज्यांमध्ये कोरोनाच्या नियमाचे पालन करून धार्मिक स्थळे खुली करण्यात आली आहेत. मात्र महाराष्ट्रात अद्यापही धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे त्याच्यावर अवलंबून असणारे पूजा साहित्य विक्रेते, हारफुले-प्रसाद विक्रेते, देवस्थानाचे सेवेकरी, देवस्थानातील कर्मचारी वर्ग यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. मंदिरे बंद असल्यामुळे या कुटुंबाचं आर्थिक चक्र ठप्प झाले आहेत. याच्या निषेधार्थ अध्यात्मिक सेलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये दिवाळीच्या आत सर्व धार्मिक स्थळे सुरु करावीत अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आले. यावेळी आध्यत्मिक सेलचे अध्यक्ष अजयकुमार वाले, निशिकांत शेटे महाराज, माजी आमदार नितीन शिंदे, कामगार आघाडी प्रदेश उपाध्यक्ष अविनाश मोहिते, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, नगरसेवक सुब्राव मद्रासी, नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर, मोहन जामदार, सलीम पन्हाळकर, अशोकराव पवार, गौस पठाण, चंद्रकांत बेलवलकर, ज्ञानेश्वर पोतदार, वैशाली पाटील, शैलजा कोळी, प्रियानंद कांबळे, सदाशिव गुरव, अनंत गुरव, उत्तम शिवाजी ठोंबरे, शशिकांत गुरव आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Start temples, places of worship before Diwali. Movement on behalf of BJP spiritual front