Gram Panchayat Election : 452 ग्रामपंचायतींसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

State Election Commission Voter list program announced for 452 Gram Panchayats Election 2022 sangli

Gram Panchayat Election : 452 ग्रामपंचायतींसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर

सांगली : राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत तसेच नव्याने स्थापित झालेल्या ४५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक १३ ऑक्टोबर असून हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक १८ ऑक्टोबर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करण्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे - मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक ३१ मे २०२२, प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक १३ ऑक्टोबर २०२२, हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी १३ ऑक्टोबर ते १८ पर्यंत असेल. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्धी करण्याची तारीख २१ ऑक्टोबर आहे. जिल्ह्यात ४५२ ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे. मिरज तालुक्यातील ३८, तासगाव - २६, कवठेमहांकाळ - २९, जत - ८१, खानापूर - ४५, आटपाडी - २६, पलूस - १६, कडेगाव - ४३, वाळवा - ८८, शिराळा - ६०.