येरळातून बैलांच्या सहाय्याने वाळू चोरी; कारवाई करायची कशी? 

Stealing sand from Yerla with the help of oxen; How to take action?
Stealing sand from Yerla with the help of oxen; How to take action?
Updated on: 

वांगी : कडेगांव तालुक्‍यातील बहुतांश गावांना सुजलाम-सुफलाम करणाऱ्या येरळा नदीतील वाळू चोरी सुरूत आहे. हा निसर्गाचे लचके तोडण्याचा प्रकार महसूल विभागाला काही केल्या रोखता येईना. बैलगाडीतून वाळू चोरुन नदीकाठावर ट्रॅक्‍टर भरण्याचा प्रकार येथे चार ठिकाणी सुरु आहे. रोज शेकडो ब्रास वाळूची चोरी सुरू आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या बैलांवर काय कारवाई करायची ? असा प्रशासनाला प्रश्‍न पडला आहे. 

कडेगांव तालुक्‍यासाठी नव्याने आलेल्या प्रभारी प्रांताधिकारी आयुषी सिंह यांनी सुरुवातीला वाळू तस्करांना चाप लावला. त्यानंतर काही प्रमाणात वाळू चोरीला लगाम बसला. नदीकाठच्या तस्करांनी वाळू चोरीचा नविन फंडा शोधून काढला. वांगीकर त्यात आघाडीवर आहेत. 

वांगीतील येरळाकाठच्या चिमटा परीसर, शेळकबाव पूल, गणेशनगर आणि साळुंखे वस्ती या ठिकाणावरुन रोज 20 बैलगाड्या वाळूची चोरी सुरू आहे. सायंकाळी चार ते रात्री आठ आणि पहाटे चार ते सकाळी सात या दरम्यान वाळू चोरी जोरात सुरू आहे. हे तस्कर नदीतून बैलगाडीतून वाळू काढून काठावर सुमारे 500 फूट अंतरावर ट्रॅक्‍टर भरुन विक्रीसाठी नेत आहेत. तीन बैलगाड्यात दोन ट्रॅक्‍टर भरतात. ट्रॅक्‍टरची एक खेप एक हजाराला विकली जात आहे. 

सध्या बांधकामे जोरात सुरु असल्याने येरळेच्या वाळूला मागणी वाढली आहे. ती चढ्या भावाने विकली जात आहे. थोड्याशा श्रमात वारेमाप पैसा मिळत असल्याने बैल घेऊन वाळू चोरणा-यांची संख्याही वाढली आहे. 

केवळ गाड्या जप्त करा :
बैलांच्या सहाय्याने चालवल्या जाणाऱ्या वाहनांवर काय कारवाई करायची असा प्रशासनासमोर संभ्रम आहे. यामुळे कारवाई शून्य आहे. प्रशासनाने केवळ गाड्या जप्त करुन गाडीमालकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी येरळाकाठचे शेतकरी करीत आहेत. 

रोज 20 गाड्या वाळूची चोरी :
बैलगाड्याच्या तीन खेपांत वाळूच्या दोन ट्रॉली भरतात. एक खेप आठ हजारांला विकली जात आहे. ट्रॅक्‍टर नसणारे गाडीवान पाच हजाराला एक ट्रॅक्‍टर भरुन देत आहेत. अशाप्रकारे सकाळ व सायंकाळी प्रत्येक गाडी चार -पाच गाड्या काढून ट्रॉलीत भरुन वाळू विकत आहेत. अशा 20 बैलगाड्या रोज येरळेतील वाळूवर तुटून पडत आहेत. 
 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Islampur Police Arrest Two Suspects in Alleged Assault Case
Ped Water Shortage
Mumbai Bengaluru Special Train
TET Exemption Plea Rejected
Marathi News Esakal
www.esakal.com