जिल्ह्यातील दरवर्षीची आकडेवारी पाहता निम्मी संख्या वाळवा तालुक्यातील आहे. तेथे गत वर्षी १४, तर यंदा २५ पुरुषांनी शस्त्रक्रिया केली आहे.
सांगली : कुटुंब नियोजनाच्या (Family Planning) शस्त्रक्रियेत स्त्रियांच्या जीवाला धोका अधिक असतो. तिच्या प्रकृतीवर परिणाम अधिक होऊ शकतो. तुलनेत पुरुषाने नसबंदी शस्त्रक्रिया करून घ्यायची ठरवली, तर वेळ, पैसा वाचतोच, शिवाय धोकाही शून्य. तरीही इथे आपले ‘पुरुषत्व’ गुंडाळून ठेवण्यातच ते धन्यता मानताना दिसतात. हे सिद्ध करणारी आकडेवारी म्हणजे, या वर्षी जिल्ह्यात केवळ ४७ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया (Sterilization Surgery) करवून घेतली आहे.