तनिष्कांचा स्त्री भ्रूणहत्या रोखण्याचा निमगाव येथे संकल्प

अमोल वाघमारे
रविवार, 18 मार्च 2018

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवडीसह 'स्त्री' भ्रूणहत्या रोखण्याचा संकल्प करत तनिष्का सदस्यांनी स्त्री प्रतिष्ठेची गुढी उभारली.

सावळीविहीर जि. अहमदनगर - निमगाव (ता. राहाता) येथील 'तनिष्का' सदस्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवडीसह 'स्त्री' भ्रूणहत्या रोखण्याचा संकल्प करत स्त्री प्रतिष्ठेची गुढी उभारली. यावेळी स्त्री भृण हत्या रोखण्यासाठी प्रयत्न व जनजागृती, महिलांचे आरोग्य आणि वृक्षारोपण यासाठी तनिष्का महिलांनी एकजुटीने काम करण्याचा संकल्प केला. यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती सुमनताई जगताप, ग्रामपंचायत सदस्या संगिता गाडेकर, विद्याताई कातोरे, प्राची कातोरे, स्वाती जोशी यांच्या हस्ते गुढीचे पुजन करुन स्त्री प्रतिष्ठेची गुढी उभारण्यात आली.यावेळी सुधाताई गोंदकर, स्वरुपा सुलाखे, ज्योती लोहकरे, रोहिणी जोशी, अश्वीनी वाघमारे, लता रायरिकर, स्वराली ढवळे, मृणाल जोशी, प्रणिता जोशी, प्रियंका हराळे आदी तनिष्कांसह महिला उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना सुमनताई जगताप म्हणाल्या की, स्त्री भृणहत्या रोखण्यासाठी महिलांनी पुढे यायला हवे. समाजाने मुलींना शिकवुन आपल्या पायावर उभे करावे.ग्रामपंचायत सदस्या गाडेकर म्हणाल्या की,मुले वंशाचा दिवा समजला जात असले तरी मुली मात्र वंशाची पणती आहे.आज ग्रामपंचायतीच्या कारभारात महिलांना शासनाने संधी देऊन महिलांसाठी खऱ्या अर्थान स्त्री प्रतिषेठेची गुढी उभारली आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत करावे असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी बाळासाहेब जोशी यांनी पौराहित्य केले. पाहुण्यांचे स्वागत ज्योती लोहकरे यांनी केले. आभार सुधाताई गोंदकर यांनी मानले.

Web Title: stop female feticide by tanishka nimgaon