थकेल ती माऊली कसली 

The story of a mother with a disability
The story of a mother with a disability

सोलापूर : मुलाने शिक्षण घ्यावं, मोठं व्हावे, त्याला नोकरी चांगली मिळावी अशी इच्छा प्रत्येक आई- वडिलांची असते. मुलांचा मोठेपणा हाच त्यांचा मोठेपणा असतो. पण एखादे मुलं जन्मातच दिव्यांग असेल तर..! तरीसुद्धा आईची इच्छा हीच असते की त्याचे आयुष्य व्यवस्थित व्हावे. याच इच्छेतून एका माऊलीने दिव्यांग मुलाचे करिअर करण्याचा संकल्प केला आणि त्याच्या पुर्तत्वासाठी ती झगडत आहे. या मुलाला चालताही येत नाही. तरीही त्याचे शिक्षण आईने पूर्ण केले. तो स्वत: आता चार पैसे मिळतील तेवढे काम करतो आहे, मात्र अजूनही आईचा संघर्ष संपलेला नाही. त्याच्या दिवसभराच्या प्रत्येक कामात आईचा वाटा असतो. आणि न थकता आई त्याच्या कामात मदत करते ती माऊली आहे सुनीता वैद्य! त्या जुळे सोलापुरात बसवराज निलम नगर, रूबी नगरजवळ राहतात. त्यांचे वय साधारण 60 च्या दरम्यान आहे. 

हेही वाचा - सोलापुरात आता आता मुंबईची चटपटीत स्पेशल कच्छी दाबेली (व्हिडिओ) 
12 वी पर्यंत शिक्षण
 
अभिषेक हा त्यांचा एकुलता एक मुलगा. तो जन्मल्यापासूनच दिव्यांग आहे. त्याला चालता येत नाही. उठून बसता येत नाही. फक्त घरातले घरातच तो त्याचा व्यायाम करतो. मात्र, अशा स्थितीतही त्याने आई- वडिलांकडे शिक्षणाची इच्छा व्यक्त केली. मग त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आईने मदत कसला. सुनीता वैद्य या त्याला शाळेत घेऊन जाऊ लागल्या. प्राथमिक शिक्षणानंतर त्याला आदर्श मार्कंडेय विद्यालयात घालण्यात आले. तेथे त्याचे 12 वीपर्यंतचे शिक्षण झाले. दररोज त्याला शाळेत नेणे आणि आणणे एवढेच त्या काम करत होत्या. पुढे त्याने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊन बीए शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर संगणकाचे प्रशिक्षणही घेतले. अभिषेकने आईकडे जी इच्छा व्यक्त केली ती त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्या. चालता, उठता व बसता येत नसले तरी तो ऑनलाइनची कामे करत आहे. त्यांना फक्त संगणक सुरू करून द्यावा लागतो. त्यानंतर तो दिवसभर त्यांची कामे करतो, असे सुनीता वैद्य यांनी सांगितले. 

हेही वाचा - सोलापूर जिल्ह्यात पक्षी निरीक्षणात काय नोंदी आहेत पहा 
कसे आले दिव्यांगत्व 

सुनीता वैद्य म्हणाल्या, अभिषेक प्रसूतीदरम्यान पोटातच गुदमरला. त्यामुळे सिजेरियन करणे आवश्‍यक होते. पण वेळेत ते झाले नाही. जन्मल्याबरोबर तो रडला नसल्यामुळे डॉक्‍टरांच्या म्हणण्यानुसार तो नैसर्गिक ऑक्‍सिजन रडला नाही. त्यामुळे त्याला कृत्रीम ऑक्‍सिजन देण्यात आला. त्याच्या सर्व प्रक्रिया इतर मुलांपेक्षा उशिरा होत गेल्या. वर्षाच्या आताच त्याचे दिव्यांगत्व जाणवू लागले. त्याचे हात व पाय वाकडे होऊ लागले. त्यावर काही उपायही झाला नाही. 
 
शाळेची इच्छा... 
अभिषेकला समजू लागले तेव्हा घरातील त्याची चुलत बहीण शाळेत जात होती. तिला पाहून त्यानेही शाळेत जाण्याची इच्छा व्यक्त केली. ती पूर्ण करण्यासाठी मी आणि त्याचे त्याच्या वडिलांनी प्रयत्न केले. अभिषेक शिकत गेला. आम्ही फक्त त्याला मदत केली, तो मुळातच हुशार आहे याची जाणीव आम्हाला झाला, असे सुनीता वैद्य म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com