गोष्ट एका फोटोची... गवा अन्‌ मैनेतील संवादाची 

अजित झळके
Wednesday, 19 August 2020

जागतिक छायाचित्र दिन आज म्हणजे 19 ऑगस्ट रोजी साजरा होतोय. एक फोटो हजार शब्दांचे काम करतो, असे म्हटले जाते. असाच एक फोटो आज खास या दिवसानिमित्त...

सांगली - जागतिक छायाचित्र दिन आज म्हणजे 19 ऑगस्ट रोजी साजरा होतोय. एक फोटो हजार शब्दांचे काम करतो, असे म्हटले जाते. असाच एक फोटो आज खास या दिवसानिमित्त... या फोटोची गोष्ट न्यारी आहे. हा फोटो आहे गवा आणि टिटवीतील संवादाचा. एका अवाढव्य प्राण्याचा आणि एका पक्षाचा. तो टिपला आहे मिरजेतील वाईल्ड लाईफ फोटोग्राफर दक्षा बापट यांनी. 

या फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे नॅशनल जिओग्राफी या जागतिक निसर्गविषयक माध्यमाने नॅटजिओ युअर शॉटमध्ये "यलो फ्रेम'साठी त्याची निवड झाली. हा आंतरराष्ट्रीय बहुमान समजला जातो. या चित्राचे वर्णन करण्याची काहीच गरज नाही. ते टिपले गेले होते कान्हा नॅशनल पार्क मध्यप्रदेश येथे. मे 2016 सालचा फोटो आहे, पण सर्वकाळ उत्तम छायाचित्रात त्याची गणना होऊ शकेल. दक्षा सांगतात, की त्या दिवशी पूर्ण दिवस सफारीला गेलो होतो. दोन गवे भांडणाच्या मूडमध्ये होते, त्यांनी आमची वाट अडवून ठेवली होती. गवे भांडले तरी "वाईल्ड लाईफ संघर्ष' टिपला आला असता, मात्र ते भांडले नाहीत. त्यांच्यात समझोता झाला. त्यांचे भांडण होईल म्हणून दोन तास थाबलो...

त्यानंतर काही क्षणात हा गवा बाजूला गेला आणि तेथे एक मैना आली. सेकंदाच्या काही भागात मी तीन फोटो टिपले होते, त्यातील या फोटोत ती मैना काहीतरी बोलते आहे, असे वाटते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The story of a photo ... of a dialogue between Gawa and Mynah