..घशाला गारवा  देणाऱ्यांच्या चुली थंडावल्या 

untitled.png
untitled.png

किल्लेमच्छिंद्रगड (सांगली) ः तीन महिने सरत आले तरी कोरोनाचा कहर काही संपेना. दिवसागणिक चिंता वाढविणारी परिस्थिती निर्माण होत असल्याकारणाने लॉकडाऊनमुळे छोट्या व्यवसायीकांचे जगणे मुश्‍किल झाले आहे. राज्यभरात कधी सायकलवरुन तर कधी हातगाड्याचा वापर करुन गावोगावी फिरस्ती करुन लिंबू सरबत, आईस्क्रिम विकून उदरनिर्वाह चालविणारांचा ऊन्हाळा हा चार पैसे मिळविण्याचा काळ. परंतु याच काळात कोरोनाची महामारी प्रकटली आणि इतरांच्या जीवांना गारवा देणारांच्या चुली मात्र थंडावल्या आहेत. 

एरव्ही गारेगारवाल्याने सायकलीस लावलेला जुन्या वाहनांचा हॉर्न नाहीतर मोठी घंटा वाजवत "गारेगारवाला आला..." म्हणून दिलेली आरोळी यावर्षी कोरोनाच्या दहशतीत लुप्तच झाली आहे. ग्रामीण भागात भुमिहीन भटक्‍या विमुक्त जाती, जमातील व्यक्ती ऊन्हाळ्यात फिरुन शितपदार्थांचा व्यवसाय करतात. तर पावसाळ्यापासून पुन्हा ऊन्हाळा येईपर्यंत शेतावर शेतमजुरीसाठी जातात.

कोरोनाने ऊन्हाळ्यात हातचा व्यवसाय बुडाल्याने आणि शेतात मजुरीची कामे नसल्याने या वर्गाचे जगणे असह्य होवुन बसले आहे. पुढील जगणे खरीप हंगामातील मजुरीचे काम किती मिळते यावर अवलंबुन आहे. हीच परिस्थिती शहरी भागात जीवीकेचे कोणतेच साधन नसलेल्या हाच व्यवसाय करणारांची. लॉकडाऊनमुळे यांचाही घराबाहेर पडून चार पैसे मिळविण्याचा मार्ग खुंटला आहे.

पावसाळ्यापुर्वी जर कोरोना नियंत्रणात येवुन ऊदभवलेल्या परिस्थितीत सुधारणा झाली तरच शहरातील या व्यवसायीकांना चहा, वडापावच्या गाड्यातून चार पैसे मिळविणे शक्‍य होईल अन्यथा त्यांचेही जगणे मुश्‍कील होईल. शासनाने महिलांच्या खात्यावर सरसकट दोन हजार रुपये मदत जमा केली. तथापि फिरस्ता व्यवसाय करणाऱ्यांच्या घरी ज्या एका महिलेच्या नावे मदत मिळाली,

त्यांचा सरलेल्या दोन महिन्यातील कौटुंबिक खर्चाचा दोन हजारात ताळेबंद जुळणार कसा? आणि घरी महिलेचे बॅंक खातेच नाही अशांना दमडीही मिळाली नाही त्यांनी दोन महिने कसे काढले असतील आणि भविष्यात त्यांनी पोटाला चिमटा घ्यायचा कसा? हा अनुत्तरीत करणारा प्रश्न माणसाचे जगणे अवघड आणि मरणे सुसह्य झाल्याचे अधोरखित होताना दिसून येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com