सांगली जिल्ह्याच्या सीमेवर कडक नाकाबंदी

sangli naka
sangli naka
Updated on

सांगली ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणून आता जिल्ह्याच्या सीमांना जवळपास बंद करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

त्याची कडक अंमलबजावणी आज सुरु करण्यात आली. सांगलीवाडी येथील जुन्या टोल नाक्‍यावर पोलिसांनी अत्यंत कडक भूमिका घेत कारण नसताना सांगलीत येऊ पाहणाऱ्यांना हाकलून लावले. अंकली फाटा, पद्माळे फाटा येथेही पोलिसांनी कडक नाकेबंदी केली.

पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत जिल्ह्याच्या नाकाबंदीची घोषणा केली होती. नाहक कुणी प्रवास करत असेल तर त्याला अटकाव केला जाईल, असे श्री. शर्मा यांनी स्पष्ट केले होते. त्याची आज जागोजागी काटेकोर अंमलबजावणी सुरु करण्यात आली. या प्रत्येक नाक्‍यावर पाच-सात पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे.

ते वाहनधारकांना सांगलीत प्रवेशाचे कारण विचारत आहेत. नेमके व खरे कारण असेल तरच प्रवेश दिला जातोय. काहींना तर परत धाडण्यात आले. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, अपर पोलिस अधीक्षक मनिषा दुबुले, पोलिस उपाधीक्षक संदीपसिंह गील आणि अशोक वीरकर स्वतः मैदानात उतरून दक्षता घेत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक, जलद कृती दल, राखीव दल सर्व मैदानात उतरले आहेत.

सांगलीवाडी येथे टोल नाक्‍यावर अत्यंत कडक तपासणी सुरु करण्यात आली आहे. विशेषतः या नाक्‍यावरून पुणे आणि मुंबईचे लोक येत आहेत. त्यांची तपासणी व्हावी, हा मुख्य उद्देश. दुपारी गुजरातहून एक वाहन आले. त्यांच्याकडे सांगलीत येण्याचे ठोस कारण नव्हते. त्यामुळे त्यांना परत धाडण्यात आले. येथे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर आणि त्यांचे डझनभर पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ता निखील शिंदे याने प्रवाशांना ताप आहे का, याची तपासणी केली. सामाजिक कार्यकर्ता मुस्तफा मुजावर यानेही पोलिसांना सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli Political News
Sangli Municipal Corporation Recruitment
Krishna River Crocodile Sighting
Karnataka Sugar Season Date Yet to Be Announced
Marathi News Esakal
www.esakal.com