महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कडक बंदोबस्त करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Strict security on Maharashtra Karnataka border
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कडक बंदोबस्त करा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कडक बंदोबस्त करा!

कोगनोळी : कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग (National Highway 4) क्रमांक चार वर दूधगंगा नदीवर असणाऱ्या कर्नाटक(Karnataka) सीमा तपासणी नाक्याला बेळगाव जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी भेट देऊन सुरु असलेल्या कामकाजाची पाहणी केली.

हेही वाचा: यवतमाळ : किती हा भ्रष्टाचार? हाताने खणला जातोय रस्ता

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ म्हणाले, महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांचे ओळखपत्र व आरटीपीसीआर रिपोर्ट पाहूनच कर्नाटकात प्रवेश द्यावा. बंदोबस्त कडक करण्यात यावा. रिपोर्ट नसणाऱ्या प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश देऊ नये त्यांना परत महाराष्ट्रात पाठवून देण्यात यावे. महाराष्ट्र राज्यात दोन दिवसांमध्ये रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आले आहेत.

हेही वाचा: संजीव बजाज यांच्यासह तिघांना ईमेलद्वारे साडे अकरा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी

निपाणीचे तहसीलदार डॉक्टर मोहन भस्मे यांनी कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर सुरू असणार्‍या कामकाजाची माहिती दिली. यावेळी निरीक्षक अभिजीत गायकवाड, सर्कल अजित वंजोळे, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, उपनिरीक्षक सिद्रामप्पा उनद, कोगनोळी पोलीस स्टेशनचे एएसआय एस ए टोलगी, एएसआय एस ए कंभार, राजू गोरखनावर, आरोग्य सेविका जयशिला, आशा कार्यकर्त्या अश्विनी खोत, राजश्री ढाले उपस्थित होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top