एकदम कडक.... जिल्ह्यात 32 चेकपोस्टवर होतेय काटेकोर तपासणी

check post.png
check post.png
Updated on

सांगली- परजिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात प्रवेशासाठी 32 प्रमुख नाक्‍यांवर तपासणीची कडक सोय करण्यात आली आहे. त्या ठिकाणी आतापर्यंत 1 हजाह 769 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात एकही संशयित रुग्ण आढळलेला नाही. येथे कडक तपासणी झाल्याशिवाय एकालाही जिल्ह्याची सीमा ओलांडता येणार नाही, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी स्पष्ट केले. 


अत्यंत आवश्‍यक कारणासाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्याला अतिशय कडक नियमावली करण्यात आली आहे. अत्यावश्‍यक कारणासोबत शासकीय मान्यताही महत्वाची आहे. ती प्रक्रिया पूर्ण केली तरीही वैद्यकीय तपासणीला सामोरे जावेच लागणार आहे. तेथे तपासणी होईल आणि क्वारंटाईनचा शिक्का मारला जाईल. त्यानंतरच जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश दिला जाणार आहे. आता अशा लोकांची गर्दी वाढत असताना हे 32 चेक पोस्ट महत्वाची भूमिका बजावणार आहेत. 


आटपाडी तालुक्‍यात 3, जत तालुक्‍यात 9, कवठेमहांकाळ तालुक्‍यात 2, मिरज तालुक्‍यात 3, शिराळा तालुक्‍यात 5, वाळवा तालुक्‍यात 6, खानापूर तालुक्‍यात एक तर कडेगाव तालुक्‍यात 3 चेकपोस्ट आहेत. पैकी आटपाडीत 24, जतला 481, कवठेमहांकाळला 216, मिरजेत 613, शिराळ्यात 23, वाळव्यात 149, खानापुरात 34 तर कडेगावमध्ये 188 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com