कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडेगावात कडकडीत बंद...आठ दिवस लॉक डाऊन

संतोष कणसे 
Monday, 7 September 2020

कडेगाव (सांगली)- कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता शहरात आज कडकडीत शंभर टक्के बंद पाळण्यात आला.बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट पसरला होता.आजपासून आठ दिवस कडकडीत शंभर टक्के लॉक डाऊन करण्याचा निर्णय येथील नगरपंचायत पदाधिकारी,नागरिक व व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत करीत शंभर टक्के लॉक डाऊनला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.तर कोणीही घराबाहेर पडू नये यासाठी संपूर्ण शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

शहरात दवाखाने व मेडिकल वगळता किराणा,कृषी औषधे दुकाने आदीसह जीवनावश्‍यक सेवा सर्व बंद ठेवण्यात आल्याने शहरात शांतता पसरली होती. कोरोना या रोगाने जगात दहशत पसरली आहे. तर शहरांतही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने कडेगाव शहरात व तालुक्‍यात भीतीचे वातावरण आहे. शहरात या कोरोनाची साखळी वाढू नये यासाठी व कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता शहर कोरोनापासून दूर ठेवण्याचा निर्धार येथील नागरिक व व्यापाऱ्यांनी केला आहे. 

कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी नगरपंचायत प्रशासन आणि पोलीस कार्यरत आहेत.घराबाहेर पडू नये यासाठी लोकांना वारंवार आवाहन करीत आहेत.तर पोलीस प्रशासनाने लॉक डाऊन व संचारबंदीच्या कालखंडात शहरांत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.तर अत्यावश्‍यक सेवा लॉक डाउनमधून वगळण्यात आल्या आहे.तर अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली अनेक जण विनाकारण सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत आहेत.त्यांना पोलिसांनी चांगलाच खाक्‍याही दाखवला आहे.तेव्हा नागरिकांनी संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करावे.कोरोनाचा धोका टाळण्यासाठी व शहर कोरोना मुक्त व्हावे यासाठी सर्वांनी घरी रहावे यासाठी आजपासून आठ दिवस कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.तर त्याला आज पहिल्या दिवशी लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strictly closed in Kadegaon on the background of Corona