
एसटी महामंडळाच्यावतीने राज्यभर बसेसची "सखोल स्वच्छता' मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये 31 जानेवारी अखेर 15 हजार बसेस स्वछता होईल. कोविडची महामारी अंतिम टप्प्याकडे आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण ही सुरू आहे. तरीही धोका टळलेला नाही. दक्षता म्हणून ही मोहीम राबिवण्यात येणार आहे.
नवेखेड : एसटी महामंडळाच्यावतीने राज्यभर बसेसची "सखोल स्वच्छता' मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये 31 जानेवारी अखेर 15 हजार बसेस स्वछता होईल. कोविडची महामारी अंतिम टप्प्याकडे आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण ही सुरू आहे. तरीही धोका टळलेला नाही. दक्षता म्हणून ही मोहीम राबिवण्यात येणार आहे.
एसटी हळू हळू पूर्वपदावर येत आहे. राज्यभरातील उर्वरित माध्यमिक शाळा सुरू होत आहेत. कोविडच्या काळामध्ये स्वच्छतेला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. व्यक्तिगत स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संसर्गजन्य पृष्ठभाग जर फेस असलेल्या साबणाच्या पाण्याने धुतल्यास त्यावरील कोविड जंतू नष्ट होतो... आणि त्यांची साखळी संपुष्टात येते. या गृहितकावर सखोल स्वच्छता ही संकल्पना आधारित आहे.
एसटी मधून दररोज शेकडो- हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. या प्रवाशांना कोविड- मुक्त स्वच्छ बस प्रवासासाठी पुरवणे हे एसटी महामंडळाचे कर्तव्य आहे. त्या उद्देशाने प्रत्येक बसची सखोल स्वच्छता करून मार्गस्थ झाल्यास, प्रवासी बिनधास्तपणे त्यामधून मधून प्रवास करतील. त्यासाठी सखोल स्वच्छतेची संकल्पना प्रत्येक आगारात अंमलात आणण्यात येणार आहे.
फेसयुक्त पाण्यामुळे संपूर्ण बस कोविडपासून मुक्त होईलच. याशिवाय कित्येक दिवसांपासून येणारा बसचा कळकट, मळकट वाससुद्धा निघून जाईल. यामुळे प्रवाशांना स्वच्छ व निर्जंतुक केलेली बस प्रवाशांना प्रवासासाठी उपलब्ध होणार आहे. एसटीचे हे चित्र सुखावणारे ठरणार आहे.
अशी होईल सखोल स्वच्छता...
या मोहिमेत धुण्याचा सोडा व गरजेनुसार शाम्पू घेऊन त्याचा भरपूर फेस करून गाडीच्या आतील टफ, खिडक्यांची तावदाने, सर्व आसने ग्रीप हॅंडल हे सर्व घासून घ्यावे. यासाठी नारळाचा काथ्या अथवा नायलॉनचा फोम-ब्रश वापरवा. त्यानंतर स्पंज अथवा साध्या कापडी फडक्याने फेसयुक्त पाण्याद्वारे गाडीच्या खिडकीच्या सर्व काचा, बाहेरील पृष्ठभाग, समोरील काच स्वच्छ पुसून घ्यावी. यानंतर पाण्याच्या फवाऱ्याने संपूर्ण बस स्वच्छ करावी.
संपादन : प्रफुल्ल सुतार