एसटीचा लाचखोर आगारप्रमुख अखेर निलंबित; चालकाकडूनच घेतली होती दहा हजारांची लाच

ST's corrupt depot chief finally suspended; Ten thousand bribe was taken from the driver
ST's corrupt depot chief finally suspended; Ten thousand bribe was taken from the driver

सांगली : लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे जनजागृती सप्ताह सुरू असताना एका चालकाकडून दहा हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी अटक केलेला कवठेमहांकाळचा आगारप्रमुख स्वप्नील लालासाहेब पाटील (वय 30, रा. सांगली) याला अखेर निलंबित करण्यात आले. लाचप्रकरणी कारवाई केल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर एसटीचे नियंत्रण समिती अध्यक्ष क्रमांक एक यांनी ही कारवाई केली. 

अधिक माहिती अशी, एसटीच्या एका चालकाची चौकशी सुरू होती. चौकशी दरम्यान चालकाची दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्याच्या शिक्षेचा अहवाल न पाठवता सहा महिने एवढ्या अल्प वेतनवाढ रोखण्याचा अहवाल पाठवतो, असे सांगून आगारप्रमुख स्वप्नील पाटीलने त्या चालकाकडे दहा हजार रुपये लाच मागितली. एकीकडे दोन महिने वेतनवाढ थकीत असताना दहा हजार रुपये द्यायचे कोठून म्हणून चालकाने धाडसाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 28 ऑक्‍टोबरला सापळा रचून दहा हजार रुपये लाच घेताना पाटीलला अटक केली. दुसऱ्या दिवशी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर एक दिवसाची पोलिस कोठडीही घेतली. त्यानंतर सशर्त जामीन मंजूर झाला. परंतु आरोपपत्र दाखल होईपर्यंत प्रत्येक सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे हजेरी लावण्याचा आदेशही दिला. 

दरम्यान, आगारप्रमुख पाटील याच्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगली विभाग नियंत्रक यांना पाठवला होता. त्यांनी तो अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला. या अहवालानंतर नियंत्रण समिती अध्यक्ष क्रमांक 1 यांनी स्वप्निल पाटील याला निलंबित केले आहे. निलंबन केल्याचा आदेशही सांगलीच्या विभाग नियंत्रक कार्यालयाकडे नुकताच पाठवला आहे. 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com