बनारसचे विद्यार्थी करकंबमध्ये

karkamb
karkamb

करकंब (सोलापूर) : बनारस येथील हिंदू विद्यापिठात कृषी पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोलापूर येथिल डाळिंब संशोधन केंद्रातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब येथिल महेश व्यवहारे यांच्या डाळिंब शेतीला भेट देवून माहिती जाणून घेतली. उच्च प्रतीचे डाळिंब प्रथमच पाहून हरखून गेलेल्या ह्या विध्यार्थ्यांनी बनारसमध्ये डाळिंबाची बाग लावून चांगले उत्पादन घेण्याचा मानस व्यक्त केला. 

बनारस येथील हिंदू विद्यापिठामध्ये कृषीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे चार गट करुन ते देशाच्या वेगवेगळ्या भागात त्या-त्या भागातील प्रसिद्ध असणाऱ्या पिकांचे व्यवस्थापन व मार्केंटिंग यासंबंधिचा अभ्यास करण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब शेतीचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांची एकटीम चार दिवसाच्या अभ्यास दौऱ्यासाठी येथिल डाळिंब संशोधन केंद्रात दाखल झाली होती. या ठिकाणी तीन दिवसांमध्ये या विद्यार्थ्यांनी डाळिंब शेतीच्या लागवडीपासून काढणीपच्छात प्रक्रिया उद्योगापर्यंतची सर्व माहिती जाणून घेतली.

शेवटच्या दिवशी प्रत्यक्ष डाळिंब शेतीला भेट देताना त्यांनी डाळिंब संशोधन केंद्राचे तांत्रिक अधिकारी युवराज शिंदे व संशोधन सहयोगी धनंजय मुंढेवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा एकर डाळिंबाचे क्षेत्र असणाऱ्या करकंब येथिल महेश व्यवहारे यांच्या शेतीला भेट दिली. यावेळी व्यवहारे यांच्या एका डाळिंब बागेत मृग बहाराची छाटणी चालू होती तर एक बाग आंबे बहाराने लखडून गेली होती. त्यामुळे ह्या विध्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे डाळिंब छाटणीचे तंत्र जाणून घेता आले तर बहारात असणाऱ्या बागेमुळे डाळिंबाची उच्चतम प्रतही पाहता आली. याशिवाय व्यवहारे यांनी स्वानुभवातून त्यांना छाटणी, विरळणी, खत व पाणी व्यवस्थापन, मार्केंटिंग याबाबत सविस्तर माहिती देतानाच डाळिंब शेतीतील अडचणीवर करावयाची मात व संधी याविषयी माहिती दिली.

सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर ह्या विध्यार्थ्यांमध्ये डाळिंब शेतीविषयी आत्मविश्वास विर्माण होवून त्यांनी आपल्या शेतीमध्ये डाळिंबाचे उत्पादन घेण्याचा मानस व्यक्त केला. त्यास व्यवहारे व डाळिंब संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांनिही आवश्यक ते सर्व मार्गदर्शन वेळोवेळी करण्याचे अभिवचन त्यांना दिले. बनारस येथून आलेल्या विध्यार्थ्यांमध्ये मानसी मिश्रा, दिपांजली श्रीवास्तव, शालू श्रीवास्तव, प्रिती यादव या मुलींसह सुदीप अधिकारी (नेपाळ), वेदांत पाटील, शुभम दुबे (झारखंड), मनीशकुमार टुडू (बिहार), सईद अहमद, विशाल तिवारी, पंकज सिंह, शिवम कुमार, सुरज कुमार, अपूर्व खरे, हिमांशु श्रीवास्तव, आदी विध्यार्थ्यांचा समावेश होता. 

आमच्या डाळिंब शेतीस बनारस हिंदू विद्यापिठातील कृषीचे शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांनी भेट देवून डाळिंबाच्या लागवडीपासून ते मार्केंटिंग पर्यंतचे तंत्रज्ञान जाणून घेतले. आपल्या येथिल तीन नंबर प्रतीचे डाळिंब बनारस मध्ये एक नंबरचे समजले जाते. या विध्यार्थी डाळिंबाची नंबर एकची प्रत पाहून हरखून गेले व तसे उत्पादन बनारसमध्ये घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यापूर्वीही पश्चिम बंगालमधील श्रीजन संस्थेच्या पन्नास शेतकऱ्यांनी आमच्या डाळिंब शेतीस भेट देवून माहिती जाणून घेतली होती.
- महेश व्यवहारे (डाळिंब बागायतदार, करकंब)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com