जतमधील उटगीत विहिरीत पाय घसरून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

सांगली - जत तालुक्यातील उटगी येथे विहिरीत पाय घसरून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भोजप्पा कल्लाप्पा बरगुडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. 

सांगली - जत तालुक्यातील उटगी येथे विहिरीत पाय घसरून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भोजप्पा कल्लाप्पा बरगुडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. 

भोजप्पा हा उटगी येथील भारत हायस्कूल व कन्नड उच्च माध्यमिक महाविद्यालयामध्ये १२ वीत शिक्षण घेत होता. भोजप्पा तीन वर्ग मित्रांसह कपडे धुण्यासाठी जाडरबोबलाद रस्त्यावरील शांताबाई गिरमल्ला बिराजदार यांच्या मालकीच्या मळ्यातील विहिरीमध्ये गेला होता. कपडे धुताना त्याचा पाय घसरला व तो 40 फुट खोल विहिरीत पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student dies after falling in a well in Jat Taluka Utagi Village