नगरमध्ये गुरूवारी विद्यार्थी साहित्य संमेलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा व मराठी भाषा अधिक समृद्ध व्हावी, यासाठी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून आपल्या शहरात प्रथमच विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

नगर ः महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा व शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशनतर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त गुरुवारी (ता. 27) सकाळी 9.30 वाजता नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन्स येथे एकदिवसीय विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली.

 
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा व मराठी भाषा अधिक समृद्ध व्हावी, यासाठी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून आपल्या शहरात प्रथमच विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्येष्ठ बालसाहित्यिक व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ल. म. कडू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या विद्यार्थी साहित्य संमेलनात आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, आशा फिरोदिया, जिल्हा पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, महापालिका उपआयुक्त डॉ. प्रदीप पठारे, साहित्यिक प्रा. सु. प्र. कुलकर्णी, डॉ. संजय कळमकर, प्रा. शशिकांत शिंदे, शिक्षणाधिकारी दिलीप थोरे, रमाकांत काटमोरे, सुभाष पवार आदी उपस्थित राहणार आहेत. 

ग्रंथपूजन, उद्‌घाटन, लेखक तुमच्या भेटीला, बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत अभिनयाचे रौप्यपदक मिळविणारी "पिंटी' एकांकिका एकपात्री प्रयोग होणार आहे, अशी माहिती मसाप सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह व संमेलनाचे संयोजक जयंत येलूलकर यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student Literature Meeting in Ahmednagar on Thursday