पुण्यातून बस न मिळाल्याने अकोल्याच्या विद्यार्थ्याने सायकलवर गाठलं गाव

शांताराम काळे
सोमवार, 23 मार्च 2020

अडकून पडलेला असाच एक अकोल्याचा विद्यार्थी पुण्यात अडकून पडला होता. अनिल मंडलिक त्यांचं नाव. त्याला तर गावाकडं यायचं होतं. जाणार कसं. मग त्याने काढली सायकल. आणि तब्बल १८६ किलोमीटरचा प्रवास करीत गावी आला.

अकोले : कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावामुळे सारे जग हादरले अाहे. पुण्या-मंबईचे तसेच परदेशातील लोक गावाकडे परतू लागले आहेत. मिळेल त्या साधनाद्वारे ते घर गाठत आहेत. जनता कर्फ्यू तसेच संचारबंदी अशा आदेशांमुळे रस्त्यावर वाहन दिसेना झालं आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे.

असाच एक अकोल्याचा विद्यार्थी पुण्यात अडकून पडला होता. अनिल मंडलिक त्यांचं नाव. त्याला तर गावाकडं यायचं होतं. जाणार कसं. मग त्याने काढली सायकल. आणि तब्बल १८६ किलोमीटरचा प्रवास करीत गावी आला. अकोल्यातील गर्दनी हे त्याचं गाव. घरी आल्यावर त्याने आपला गुदमरलेला श्वास आई-वडील नातेवाईकांसमोर सोडला. 

अनिल घरी आल्यामुळे त्याच्या आई-वडिलांना उडालेली झोप पुन्हा आली. अनिलच्या मामाच्या मुलाचे लग्न असल्यामुळे त्याला गर्दनी येथे येणे आवश्यक होते. एसटीतील गर्दी टाळण्यासाठी घेतला.  

कोरोनाच्या धास्तीने पुण्यातून मोठ्या संख्येने नागरिक रेल्वे,एसटीने प्रवास करत आहेत.एसटीला असलेली गर्दी पाहून एसटीने प्रवास न करणाच्या अनिल मंडलिक या विद्यार्थ्याने सायकलचा पर्याय निवडला. पहिल्यांदाच सायकलवर घरी गेलेल्या अनिलला प्रवासात प्रचंड थकवा आला. मजल दरमजल करीत बारा तासांत तो पोहोचला.

या अगोदर मी कधीच एबढा मोठा सायकलवर प्रवास केला नव्हता.  दुपारी पुण्यातून तो निघाला. रात्री बारा बाजून दहा मिनिटांनी वरी पोहचला. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे. अनिल मंडलिक हा शिवाजीनगर स्थानकावर गेला. परंतु तेथील गर्दी पाहून त्याने या गर्दीत प्रवास न करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा रूमवर गेला. सकाळी उठून त्याने सायकलवर जाण्याचा निश्चिय केला.

त्याला मित्रांनी विरोध केला. परंतु आजारपण टाळण्यासाठी सायकलचाच प्रवास योग्य असल्याचे सांगितलं. दुपारी बाराच्या सुमारास त्याने प्रवास सुरू केला. सांगवी ते नाशिक रोड सायकलने प्रवासास सुरुवात केली. राजगुरूनागरच्या अगोदर त्याने एक तास अराम केला. अनिलच्या कुटुंबाकडून सातत्याने घरी येण्याचा तगादा सुरु होता. 

कोरोनाच्या साथीने सर्व जग भीतीने कपात असताना मुलाच्या काळजीने त्याचे आई वडील घाबरले होते. पुणे येथे  परीक्षेचा अभ्यास करीत असताना अभ्यासिका बंद, मेस बंद झाली होती. त्यामुळे गावी परतावेच लागणार होते. घरी पोहोचताच वडील सखाहारी व आई ताराबाई यांनी अलिंगन दिले. अनिलनेही त्यांच्या पाय पडून दर्शन घेतले. अनिल हा हुशार विद्यार्थी अाहे. तो स्पर्धा परीक्षेसाठी पुणे येथे असतो, असे परबत नाईकवाडी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The student reached the village on a bicycle