राज्यातील विद्यार्थी क्रीडा क्षेत्राकडे आकृष्ट : राजेंद्र पवार

राज्यातील विद्यार्थी क्रीडा क्षेत्राकडे आकृष्ट : राजेंद्र पवार
Updated on

सातारा ः राज्यातील क्रीडापटूंमधील गुणवत्ता नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेतून अधोरेखित झाली आहे. गुणवंत व नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासकीय नोकरीत आरक्षण, क्रीडा शिष्यवृत्ती अशा सुविधा शासन देत असल्याने अधिकाधिक विद्यार्थी क्रीडा क्षेत्राकडे आकृष्ट होऊ लागले आहेत, असे प्रतिपादन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले. 

येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाद्वारे आयोजिलेल्या कोल्हापूर विभागीय आंतरशालेय जलतरण स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी श्री. पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक होते. यावेळी क्रीडाधिकारी राजेंद्र अतनूर, सुनील कोळी, क्रीडा संघटक राजेंद्र माने, महेंद्र गाढवे, सुधीर चोरगे आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, ""खाशाबा जाधव यांच्या प्रेरणेतून साताऱ्याच्या मातीतून घडलेले खेळाडू आज विदेशातही देशाचे नाव झळकावत आहेत. जलतरणमध्ये कोल्हापूरच्या वीरधवल खाडेने जिद्द व कष्टाच्या जोरावर नावलौकिक मिळविला आहे. बहुतांश खेळाडूंची जडघडण शालेय क्रीडा स्पर्धेतूनच झाली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल कामगिरी केलेल्या खेळाडूंना शिष्यवृत्ती, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना नोकरीची संधी अशा सुविधा शासन देत आहे. खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी गुणवत्ता सिद्ध केली आहे. आगामी काळात ऑलिंपिकमध्ये राज्यातील खेळाडू मोठ्या संख्येने प्रतिनिधित्व करतील, असा विश्‍वास वाटतो.'' श्री. नाईक यांनी प्रास्ताविक केले. अतूनर यांनी आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli DCC Bank recruitment latest update
Maharashtra pomegranate price latest update
Sangli farmers oppose Shaktipeeth Expressway
When will Sangli DCC Bank recruitment restart?
Marathi News Esakal
www.esakal.com