सोलापूर विद्यापीठ प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचा विद्यापीठातच ठिय्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

विद्यापीठ प्रशासनाने बीबीएच्या द्वितीय वर्षातील दोन विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर विद्यापीठ ठाम असून तो निर्णय रद्द करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. 

सोलापूर - बीबीए द्वितीय वर्षाच्या चौथ्या सत्रातील इंटरनॅशनल बिझनेस आणि ऑर्गनायझेशन बिहेविअर या दोन विषयांची 14 व 16 मे ला फेरपरीक्षा घेण्याच्या सोलापूर विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात हिरांचद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, संगमेश्‍वर आणि मंगळवेढेकर इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. जोवर फेरपरीक्षेचा निर्णय रद्द होत नाही तोवर हा ठिय्या कायम राहिल, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. 

हिराचंद नेमचंद कॉलेजच्या पूर्व परीक्षेसाठी विद्यापीठाची प्रश्‍नपत्रिका वापरल्याची तक्रार संगमेश्‍वर महाविद्यालयाच्या विद्यार्थी व प्राध्यापकांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्‍त करण्यात आली असून तत्पूर्वी विद्यापीठ प्रशासनाने बीबीएच्या द्वितीय वर्षातील दोन विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर विद्यापीठ ठाम असून तो निर्णय रद्द करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. 

पेपर सेटिंग केलेल्या एका प्राध्यापकाच्या चुकीमुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने बीबीए द्वितीय वर्षाच्या चौथ्या सत्रातील दोन विषयांच्या फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, वास्तविकपणे त्यामध्ये विद्यार्थ्यांची कोणतीही चुकी नसताना त्यांनी फेरपरीक्षा का द्यावी, असा प्रश्‍न उपस्थित करत अखील भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठासमोर ठिय्या आंदोलन केले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Students movement against Solapur University administration