ख्रिश्चन बंगल्याच्या रिकाम्या मैदानावर सन १९९९ मध्ये नंदीबैलासोबत (Nandibail) भटकंती करत गौंडे कुटुंब आले. पाल टाकून इथेच राहिले.
इस्लामपूर : भटकंती करत पालावर संसार थाटणाऱ्या कुटुंबातील अमोल चिमाजी गौंडे हा तरुण फौजदार पदावर विराजमान झाला आहे. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षणाची (Zilla Parishad School Primary Education) अक्षरे गिरवणारा अमोल नंदीबैलवाले समाजातील पहिलाच अधिकारी झाला.