
इस्लामपूर (सांगली) : कापूसखेड (ता. वाळवा) येथील प्रगतशील शेतकरी व माजी सरपंच प्रदीप तुकाराम पाटील यांनी 20 गुंठे क्षेत्रात 63.732 टन इतके विक्रमी उत्पादन काढून एकरामध्ये एकरी 127. 464 टन असे उत्पादन घेतले. सरासरी एका गुंठ्यामध्ये 3 टन 186 किलो असा उतारा आहे.
प्रदीप पाटील यांनी 86032 या जातीच्या बियाणाची आडसाली लागण केली होती. प्रत्येक ऊसाला सुमारे 45 ते 47 कांड्या होत्या. पाटील यांना लहानपणापासून राजकारणाची आवड असली तरी शेतीमध्येही त्यांचा पहिल्यापासून हातखंडा आहे. त्यांना रामलिला उद्योग समुहाचे संस्थापक शहाजी पाटील यांचे मार्गदर्शन मिळत असल्यामुळे शेतीमध्ये आज त्यांनी नाव मिळविले आहे. 86032 या जातीच्या दोन डोळा टिपरी जूनच्या सुरूवातीस बियाणाची लागण केली होती. सुरूवातीस त्यांनी ऊसाची उगवण क्षमता चांगली व्हावी म्हणून कांड्या द्रावणामध्ये बुडवून त्याची लागण केली व पाणी दिले. 6 व्या आठवड्यानंतर नत्राची मात्रा दिली. 45 दिवसांनी मायक्रो शक्ती, संजीविके व बुरशीनाशक याची फवारणी घेतली. 8 व्या आठवड्यात पुन्हा नत्राची मात्रा दिली. ऊसाची उगवण क्षमता चांगली झाली.
फुटवाही चांगला झाला. बाळभरणी करतेवेळी नत्र, स्फुरद, पालाश, सुक्ष्म अन्नद्रव्य याची मात्रा दिली. त्यानंतर ठिबकद्वारे पाण्यात विरघळणारी खते ऊसाला घालण्यात आली. भरणीच्यावेळी एनपीके, राजारामबापू कारखान्याकडून घेतलेले वसंत ऊर्जा, जैविक आणि राजाराम समृद्धी खताबरोबर जीवाणू खताचाही वापर केला. ऊस तोडणीच्या दोन महिने अगोदरपर्यंत दर आठवड्याला ठिबकद्वारे प्रमाणित खतांची मात्रा दिली.
त्यामुळे तोडणीवेळी ऊसाला सुमारे 45 ते 47 कांड्या होत्या. ऊस उत्पादनासाठी राजारामबापू कारखान्याच्या शेती विभागाचे वेळोवेळी प्रशांत पाटील, सुनील पाटील यांनी ऊसाच्या प्लॉटला भेट देवून मार्गदर्शन केले. कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, ऊस विकास अधिकारी एस.एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, प्रशांत पाटील यांनीही त्यांच्या ऊस शेतीला भेट दिली होती.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.