ginger price hike latest marathi news
ginger price hike latest marathi newsesakal

Success Story : 'या' गावात आले उत्पादक बनले करोडपती; उच्चांकी दरामुळे पिकाला 'अच्छे दिन'

- संतोष कणसे

कडेगाव : गेल्या तीन वर्षांपासून कमी भाव मिळालेल्या आले पिकाला यावर्षी मात्र दरात प्रतिक्विंटल 13 ते 15 हजार रुपये असा उच्चांकी दर मिळत आहे. त्यामुळे यावर्षी तालुक्यातील बहुतांश आले उत्पादक लखपती झाले आहेत तर काही चक्क कोट्यधीश झाले आहेत.

ginger price hike latest marathi news
karnataka assembly election 2023 : "बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना", शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

आले पिक हे आठ ते नऊ महिन्यात काढणीस येते तर त्याला कमी पाणी लागत असून उसापेक्षा चांगले उत्पादन मिळवून देणारे आले पीक असल्याने येथील बहुतांश शेतकरी दर असो किंवा नसो आले लागवडीत सातत्य ठेवत आहेत.

तर गेल्या तीन वर्षांपासून आले पिकाला कमी दर मिळाला,त्यामुळे गतवर्षी अनेक शेतकऱ्यांनी आले पिकाकडे पाठ फिरवली होती.परिणामी यावेळी आल्याच्या क्षेत्रात मोठी घट झाली.परंतु यावेळी जानेवारी महिन्यापासून दर वाढण्यास सुरुवात झाल्याने आले उत्पादकामध्ये 'फिलगुड' दिसून आले.तर सध्या हा दर प्रति क्विंटल 13 ते 15 हजार रुपये असा उच्चांकी झाला आहे.

कडेगाव तालुका हा आल्याचा आगार म्हणून ओळखला जातो.तर सध्या मिळत असलेल्या विक्रमी उत्पन्नामुळे तालुक्यात आले लागवडीच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू झाली आहे.आले लागवडीपूर्वी बियाणे ढेप लावून बंदिस्त करून सावलीत ठेवले जाते.यासाठी बियाणे एक ते दीड महिना अगोदर खरेदी करावे लागते.सध्या लागवडीसाठी बियाणे खरेदी सुरू झाली आहे.

ginger price hike latest marathi news
Karnataka Election 2023 : "स्वत:चं घर जळालं ते आधी वाचवा" ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला!

पाणी,जमीन, वातावरणातील बदल केल्यास उत्पादनात वाढ होत असते. यासाठी आजूबाजूच्या गावातून,तसेच सातारा व छत्रपती संभाजीनगर येथून बियाणे आणली जात आहेत.बियाणे निरोगी असेल तर आल्यास मुळकुंजचा धोका कमी होतो.यामुळे बियाणे खरेदी करणाऱ्या प्लॉटची प्रगतशील शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी करून निरीक्षणे ठेवली जातात.

मागील दोन ते तीन वर्षात आल्याचे दरात मोठी घसरण झाली होती.त्यामुळे आले उत्पादक शेतकऱ्यांत मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात होती.मात्र चालू वर्षी आले पिक दराने चांगलीच उच्चांकी झेप घेतली आहे.तालुक्यातील शेतकरी एकरी 20 ते 25 टन इतका आल्याचा उतारा मिळवत आहेत.त्यामुळे एकरी 30 ते 35 लाख रुपये इतके आर्थिक उत्पादन मिळवत आहेत.

बियाणांचा दर प्रतिगाडी 35 हजारावर गेला आहे.

यावर्षी मात्र दरात प्रति क्विंटलला 13 ते 15 हजार रुपये असा उच्चांकी दर मिळत आहे.त्यामुळे यावेळी तालुक्यातील बहुतांश आले उत्पादक लखपती तर झाले आहेतच तर काही शेतकऱ्यांनी आले उत्पादनातून कोट्यधीश होण्याचा बहुमान मिळवला आहे.त्यामुळे तालुक्यातील आले उत्पादक शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत जात आहे.

"गतवर्षी आल्याला कमी भाव मिळाला तर यावर्षी उच्चांकी दर मिळाल्याने आले उत्पादक शेतकरी खऱ्या अर्थाने आर्थिक सक्षम झाले आहेत.तर ऊस पिकाला आले हा एक चांगला पर्याय निर्माण झाला आहे."

- दीपक शेडगे,प्रयोगशील शेतकरी

आले पिकाला मिळत असलेला उच्चांकी भाव लक्षात घेता यावेळी अनेक शेतकरी आले पिकांकडे वळले असून तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड होऊ लागली आहे.

- डी.एस.देशमुख, आले उत्पादक शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com