वीस गुंठे शेती करणारे वडील, कुटुंबाची हलाखीची आर्थिक स्थिती यामुळे शालेय शिक्षण (Education) घेत शेतात कामाला जाणारा आदित्य सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न पाहत होता.
इस्लामपूर : हलाखीची परिस्थिती, आईचे अकाली निधन (Mother Death) या दुष्टचक्रात अडकलेल्या आदित्य विश्वास फार्णे याने शालेय वयातच सैन्य दलात भरती होणार, असे स्वप्न पाहिले. केवळ स्वप्न पाहिले नाही, तर ते पूर्णही केले. २३ व्या वर्षी त्याने ‘बीएसएफ’मध्ये भरती (BSF Recruitment) होऊन यश संपादन करून कुटुंब, नातेवाईक, तसेच मित्रवर्गाला आश्चर्य, आनंदाचा धक्का दिला. आदित्य मूळचा बोरगावजवळील फार्णेवाडीचा. त्याच्या आयुष्यात लहान वयातच अनेक संकटे आली. मोठ्या उलाढाली झाल्या.