Maharashtra sugar mill sale quota
esakal
सांगली : साखरेचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश असल्याने अचानक दरातील उसळीनंतर केंद्र सरकारने तातडीने हालचाली करत साखरेचे दर नियंत्रणात आणले (sugar prices in Maharashtra today) आहेत. देशांतर्गत बाजारपेठेतील साखर दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने मासिक कोट्याऐवजी पंधरवड्याचा विक्री कोटा लागू केला आहे. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठी देशातील साखर कारखान्यांना कोटा १३ लाख टन आहे.